क्रिडाविश्वात शोककळा! टीम इंडियाचे क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

Anshuman Gaikwad Passes Away: टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झालं आहे. त्यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी 31 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ब्लड कॅन्सवर उपचार सुरु होते. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

Anshuman Gaikwad

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बीसीसीआय सचिव जय शाह आणि आजी माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. "अंशुमन गायकवाड यांचे क्रिकेटमधील योगदान स्मरणात राहील. ते एक हुशार खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.", असं मोदींनी यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे. तसंच इतर आजी माजी खेळाडूंनी शोक व्यक्त करत अंशुमन गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कपिल देव,सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर,रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद यांनी अंशुमन गायकवाड यांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले. तर कपिल देव यांनी जाहीरपणे बीसीसीआयला आवाहन केलं होतं. तर बीसीसीआयने देखील मदतीचा हात पुढे करत अंशुमन गायकवाड यांना आर्थिक म्हणून तातडीने 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

गायकवाड यांची क्रिकेट कारकीर्द

अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1984 च्या शेवटच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या कोलकाता कसोटीत त्याचा शेवटचा कसोटी सामना होता.

अंशुमन गायकवाड यांनी 40 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 201 धावा होती, जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. गायकवाड यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला, ज्यात त्याच्या नावावर 20.69 च्या सरासरीने 269 धावांचा रेकॉर्ड आहे.

अंशुमन गायकवाड यांना 40 कसोटी आणि 15 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांचाही अनुभव होता. त्यांनी 1975 ते 1987 या कालावधीत भारतीय क्रिकेट संघासाठी योगदान दिले. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कुटलेल्या 201 धावा ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी नेटाने सांभाळली.

ऑक्टोबर 1997 मध्ये त्यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली. सप्टेंबर 1999 पर्यंत त्यांनी हे पद भूषविले. त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लक्षात राहतो तो अनिल कुंबळेच्या विक्रमी कामगिरीमुळे. गायकवाड प्रशिक्षकपदी असतानाच कुंबळेने 1999 मधील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील एका डावात दहा विकेट टिपण्याचा पराक्रम केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+