Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ind vs aus : कांगारुवर टीम इंडिया भारी! रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 'हा' केला ऐतिहासिक विश्वविक्रम

Champions Trophy ind vs aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडक कामगिरी करुन भारतीय संघाने मोठा विजय साजरा केला. या विजयाने कांगारु संघाला फायनलऐवजी थेट घरचा रस्ता धरावा लागला. कांगारुला भारतीय संघ भारी पडला. एवढेच नाही तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.

भारतीय संघाने ICC ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ODI विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. टीम इंडियाने कांगारूंचा 4 विकेटने पराभव केला. यासह टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यादरम्यान विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली.

Champions Trophy ind vs aus

या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी एकप्रकारे रेकॉर्ड बुकला हादरा दिला. कोहली, रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तुम्हालाही या नोंदींची माहिती असणे आवश्यक आहे.

विराट कोहलीने 8000 धावा पूर्ण

IND विरुद्ध AUS सामन्यात विराट कोहलीने 8000 धावा पूर्ण केल्या आणि सचिन तेंडुलकरला मागे सोडले. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील 74 वे अर्धशतक पूर्ण केले. ICC नॉकआउट्समध्ये 1000 धावा करणारा कोहली पहिला क्रिकेटर ठरला. याशिवाय कोहलीने आयसीसी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक पन्नास प्लस धावा केल्या आहेत, त्याने हा पराक्रम 24 वेळा आणि सचिनने 23 वेळा केला आहे.

गेलचा विक्रम मोडला, रोहितच्या नावावर 65 षटकार

दुसरीकडे, रोहित शर्माने ख्रिस गेलचा आयसीसी स्पर्धांमध्ये षटकारांचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर 65 षटकार आहेत आणि गेलच्या नावावर ICC एकदिवसीय स्पर्धेत 64 षटकार आहेत.

धोनीनंतर रोहित शर्मा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचवणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. सौरव गांगुलीने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले होते. आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा रोहित हा जगातील पहिला कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही खेळली होती.

केएल राहुलच्या वनडेत 3000 धावा पूर्ण

केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत, हा आकडा गाठणारा तो तिसरा सर्वात जलद भारतीय आहे. शिखर धवनने 72 तर कोहलीने 75 डाव खेळले. केएल राहुलने 78 डाव खेळले.

भारतीय संघाचा हा विक्रम

भारतीय संघाने पांढऱ्या चेंडूच्या तीनही फॉरमॅटमध्ये सलगपणे अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2023 च्या विश्वचषकानंतर, 2024 च्या T20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने आयसीसी नॉकआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 261 धावांचे आव्हान ठेवले होते, आज तो विक्रम मोडीत काढत नवा इतिहास लिहिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+