Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy 2025 : करा किंवा मरा..,ही चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित-कोहलीसाठी अग्निपरीक्षा, अन्यथा...

champions Trophy 2025 : वर्ल्डकप इतकाच कठीण खेळ म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीकडे पाहिले जाते. या खेळात आठ संघ विजेतेपदासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. भारतीय संघाला देखील या ट्रॉफीकडून मोठी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या खेळात भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून देखील भारतीयांना अपेक्षा आहे. या सामन्यांमध्ये विराट व कोहली यांना करो किंवा मरो अशीच स्थिती असणार आहे, अन्यथा त्यांचा पुढील काळ हा चितादायी ठरेल, अशी चर्चा क्रीडा विश्वातून निर्माण झाली आहे.

कधीपासून सुरू होणार सामने!

19 फेब्रुवारी रोजी कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने पुढील तीन आठवडे ही स्पर्धा पूर्ण जोमात सुरू होईल. भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होतील, तर उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये खेळतील, जिथे 1996 च्या विश्वचषकानंतर पहिली आयसीसी स्पर्धा होत आहे.

Champions Trophy 2025

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामने नेहमीच 'ब्लॉकबस्टर' मानले जातात. यामध्ये, भावना सीमा ओलांडून उसळतील, आठवणींचे थर उलगडतील आणि सोशल मीडियावर देखील कहर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

..जर रोहित-कोहली चांगले खेळले नाही तर...!

या स्पर्धेत, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली अव्वल स्थानावर आहेत. असे मानले जाते की आधुनिक क्रिकेटमधील दोन्ही दिग्गज त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा परिस्थितीत, दोघांचेही उद्दिष्ट विजयाने निरोप देणे असू शकते. निकाल काहीही असो, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय एकदिवसीय संघात रोहित आणि कोहलीसाठी जागा नसल्याचे दिसून येते. जर ते या स्पर्धेत खराब खेळले तर त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. जूनमध्ये होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवडकर्त्यांना या अनुभवी खेळाडूंच्या भूमिकेचा विचार करावा लागू शकतो.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अपयशाचा दोष प्रशिक्षक गौतम गंभीरवरही येऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत चांगल्या कामगिरीमुळे गंभीरला काही क्षणिक दिलासा मिळाला असेल, पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले पराभव इतक्या लवकर विसरता येणार नाहीत. अशा परिस्थितीत आयसीसी जेतेपद त्यांच्यासाठी खूप मदत करू शकते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाने एकही एकदिवसीय विजेतेपद जिंकलेले नाही. भारतीय संघ स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून प्रवेश करेल, परंतु एका सत्रात किंवा एका क्षणाच्या खराब खेळामुळे संपूर्ण समीकरण बिघडू शकते

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+