ICC Champions Trophy Meeting: PCB ला चोख उत्तर, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही!
Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या मुद्यावर नुकतीच एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणाताही असा ठोस निर्णय होऊ शकला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
सुरक्षा आढाव्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटलं आहे. आता भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी दिसत आहे. हा मुद्दा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही उपस्थित केला होता, कारण पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार असली तरी, बीसीसीआयने स्पष्ट केले की भारताच्या सहभागाबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

सुरक्षा हे चिंतेचे मोठे कारण
नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसून, भविष्यात यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत म्हटलं आहे की, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याबाबत सुरक्षेची चिंता आहे.
लवकरचं निर्यण होईल
अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. या विधानानंतर स्पर्धेचे ठिकाण आणि भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयसीसीने 29 नोव्हेंबर रोजी सदस्य देशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करायची की अन्य ठिकाणी हलवायची याचा निर्णय होणार होता. भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याच्या शक्यतेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसून, आगामी बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications