Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियाला काय पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफ्रिकाही झाली मालामाल; कुणाला किती कोटी मिळाले?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उत्साह आज संपला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत विजेतेपद जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले? हा प्रश्न विचारला जात आहे. परंतु टीम इंडियाच नाही तर, उपविजेती न्यूझीलंड व उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांनाही करोडो रुपये मिळाले आहेत.

How much money did Team India get

टीम इंडियाला किती पैसे मिळाले?

आयसीसीने २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघासाठी मोठी रक्कम जाहीर केली आहे. या स्पर्धेसाठी एकूण $6.9 दशलक्ष बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शेवटची २०१७ मध्ये खेळवण्यात आली होती, तेव्हा आणि आता देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत ५३ टक्के फरक आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला २.२४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १९.५ कोटी रुपये) बक्षीस मिळाले आहे.

न्यूझीलंडला किती पैसे मिळाले

आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघ पराभूत झाला. मात्र असे असले तरी न्यूझीलंड संघाला भरघोस बक्षिस मिळाले. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९.७८ कोटी रुपये) मिळाले आहेत.

उपांत्य फेरीतही ५ कोटी

यंदाच्या चॅम्पियन ट्राँफीत मोठ्या रकमेचे बक्षिस ठेवण्यात आले होते. उपांत्य फेरीत पराभव पत्करून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला आयसीसीकडून $५६०,००० म्हणजेच अंदाजे ४.८९ कोटी रुपये बक्षीस मिळाले आहेत.

टीम इंडिया झाली मालामाल!

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंनी आधीच भरपूर पैसे कमावले आहे. आजच्या विजयामुळे वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा सारखे खेळाडू खूप श्रीमंत झाले. चॅम्पियन संघच नाही तर पराभूत संघावरही आयसीसीने पैशांचा वर्षाव केला. आयसीसीने काही महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठी ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६०.०६ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जाहीर केली होती. याअंतर्गत, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सुमारे $१,२५००० (सुमारे १.०८ कोटी रुपये) मिळतील. ही रक्कम फक्त सहभागासाठी दिली जाईल, तर गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी $३४,००० (सुमारे २.९५ कोटी रुपये) वेगळे दिले जातील.

रोहित सेनेला २० कोटी

चॅम्पियन झाल्यानंतर टीम रोहितला २.२४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १९.४९ कोटी रुपये) मिळाले. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स (९.७४ कोटी रुपये) मिळतील. याचा अर्थ असा की जर भारत जिंकला तर त्यांना गट टप्प्यातील सामन्यांमधील पैशांसह २१.४ कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, जर भारत हरला तर त्याला सुमारे १.३४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ११.६ कोटी रुपये) मिळतील. अर्थात, जेव्हा बक्षिसाची रक्कम इतकी मोठी असेल तेव्हा स्पर्धा खूप कठीण होणार आहे. बघूया कोणाला सुमारे २० कोटी रुपये मिळतात आणि कोणाला त्याची निम्मी रक्कम मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+