IND vs PAK: सामन्यापूर्वी भारतीय संघ स्टेडिअमवर फक्त ३० मिनिटे आधी पोहोचला; 'हे' मोठे कारण आले समोर
दुबईत सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुप्रतिक्षित लढत सुरु झाली आहे. या सामन्यात पाकिस्ताने टाँस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. चार वाजेपर्यंत पाकिस्तान संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात आपले संघाचे अर्धशतक पुर्ण केले होते. परंतु या सामन्यापूर्वी भारताचा संघ स्टेडिअमवर फक्त अर्धा तास अगोदर पोहोचला. या प्रकाराची चांगलीच चर्चा सुरु झाली. भारतीय संघ फक्त अर्धा तास अगोदर का पोहोचला, असा प्रश्न विचारला जात होता.

भारतीय संघाला झाला उशीर
काही मिडिया हाऊसच्या म्हणण्यांनुसार, भारताचा व पाकिस्तानचा संघ हाँटेलमधून एकाच वेळी स्टेडिअमकडे जाण्यास निघाला होता. परंतु पाकिस्तानची टिम स्डेडिअमवर अगोदर पोहोचली. त्यांच्यानंतर भारतीय टीम स्टेडिअमवर गेली. सरावापूर्वी दोन्ही संघ स्टेडिअमवर पोहोचले असले तरी, भारतीय संघाची बस ही दुबईतील खेळाडूंचे हाँटेल ते स्टेडिअम या रस्त्यावर असलेल्या गर्दीत अडकल्याने तिला उशीर झाल्याचे सांगितले जाते.
कोच अगोदर पोहोचले
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , दुबईतील हॉटेलपासून स्टेडियमकडे जाताना गर्दीमुळे भारतीय संघ उशीरा पोहोचला. भारतीय संघाचे दोन्ही प्रशिक्षक हे भारतीय संघाच्या अगोदर मैदानावर हजर होते. ते संघापेक्षा लवकर पोहोचले. उर्वरित संघ स्टेडियमवर येण्यापूर्वी या दोघांना स्टेडिअमवर सुमारे 30 मिनिटे वाट पहावी लागली.
पाकिस्ताचा फलंदाजीचा निर्णय
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज भारताविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण या सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तानच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या अपेक्षा आणखी कठीण होतील, असे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications