Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

752 धावा, 5 शतके, तरीही या खेळाडूला संघात स्थान नाही, अजित आगरकरने सांगितले कारण

Champions Trophy 2025 Indian Team: विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय फलंदाज करुण नायरने आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. करुण नायरला भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळेल अशी आशा होती. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचे नाव संघातून वगळण्यात आलं आहे.

कोणत्याही खेळाडूसाठी 752 च्या सरासरीने सातत्याने धावा काढणे सोपे नाही

अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना करुण नायरचे नाव न घेता त्याचं कौतुक केलं आहे. आगरकर म्हणाले की, कोणत्याही खेळाडूसाठी 752 च्या सरासरीने सातत्याने धावा काढणे सोपे नाही. पण शेवटच्या क्षणी आम्हाला संघात कोणतेही बदल करता आले नाहीत.

karun nair

भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील बहुतेक खेळाडूंना संधी दिली आहे. याच कारणामुळे करुण नायरला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये नायरची फलंदाजीची सरासरी 752 वर पोहोचली आहे. आतापर्यंत त्याने 5 शतके झळकावली असून 752 धावांसह तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

शुभमन गिल उपकर्णधार

शुभमन गिलला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं असल्याचं, पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी सांगितलं. शुभमन गिलने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला या नवीन जबाबदारीसह पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. निवडकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बहुतेक खेळाडूंना संधी दिली आहे, ज्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा भाग असलेले त्याच खेळाडूंचा संघात सहभाग करण्यात आला आहे.

शेवटची स्पर्धा 2017 मध्ये खेळवण्यात आली होती

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वोच्च धावसंख्या 331/7 आहे, जो टीम इंडियाने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ही धावसंख्या उभा केली होती. भारताचा सर्वात कमी धावसंख्या 158/10 आहे. 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने लाजीरवाणी धावसंख्या उभा केली होती. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. ही स्पर्धा 2017 मध्ये म्हणजे 8 वर्षांनी पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे.

कोणत्या संघाने किती वेळा जिंकलीय ट्रॉफी ?

ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं होतं. 2002 मध्ये भारताने श्रीलंकेसोबत विजेतेपद वाटून घेतले होते. तर 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली. इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकदा हे विजेतेपद जिंकलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+