Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई हायकोर्टाचा BCCI ला धक्का! कोची टस्कर्स मालकांच्या बाजूने 538 कोटी रुपयाचा लवादाचा निर्णय कायम

Bombay High Court upholds Rs 538 crore arbitration award in favour of Kochi Tuskers : मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे. आयपीएलमधील माजी संघ कोची टस्कर्सशी संबंधित हे प्रकरण असून त्यांची मान्यता बीसीसीआयने मध्येच रद्द केली होती. यानंतर, या फ्रँचायझीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने कोची टस्कर्स केरळच्या मालकाच्या बाजूने दिलेला निवाडा कायम ठेवला आहे.

Bombay High Court

या निवाड्यानुसार, उच्च न्यायालयाने कोची टस्कर्स केरळच्या मालकांच्या बाजूने ५३८ कोटी रुपयांचा मध्यस्थी निवाडा कायम ठेवला. न्यायमूर्ती आरआय छागला यांनी या प्रकरणात म्हटले आहे की न्यायालय अपीलप्रमाणे मध्यस्थांचा निर्णय बदलू शकत नाही. याचा अर्थ असा की मध्यस्थांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. बीसीसीआयने बँक गॅरंटी न मिळाल्याचे कारण देत कोची टस्कर्स केरळची फ्रँचायझी रद्द केली होती.

काय आहे वाद?

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, २०११ मध्ये बीसीसीआयने कोची टस्कर्स केरळचा करार रद्द केला तेव्हा हा वाद सुरू झाला. संघ रेंडेझव्हस स्पोर्ट्स वर्ल्ड (आरएसडब्ल्यू) च्या नेतृत्वाखालील एका संघाकडे सोपवण्यात आला, जो नंतर कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड (केसीपीएल) द्वारे चालवला गेला. करारानुसार, फ्रँचायझीला त्याच वर्षी मार्चपर्यंत बँक हमी सादर करायची होती, परंतु केसीपीएल ते पूर्ण करू शकले नाही. बोर्डाने अनेक महिने केसीपीएलशी संपर्क साधला आणि पैसे स्वीकारले पण अचानक संघाचा करार रद्द केला. याशिवाय, पूर्वी दिलेली बँक हमी देखील जप्त करण्यात आली.

केसीएलचा मध्यस्तीसाठी करार

कोची टस्कर्सला २०११ मध्ये एक संघ म्हणून निवडले गेले, त्यानंतर या संघाचा प्रवास फक्त एका वर्षातच संपला. नंतर संघ १५५० कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. या संघाची कामगिरी सांगायची झाल्यास १४ पैकी ८ सामन्यात या संघाला पराभव पत्करावा लागला होता यासह, हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला. नंतर, कराराचे उल्लंघन केल्याचे कारण देत संघ रद्द करण्यात आला. यानंतर २०१२ मध्ये केसीपीएल आणि आरएसडब्ल्यूने त्याविरुद्ध मध्यस्थीसाठी अर्ज केला आणि बीसीसीआय बोर्डावर अन्याय्य पद्धतीने करार रद्द केल्याचा आरोपही केला होता.

हेही वाचा : IND vs ENG कसोटी मालिका: 'पतौडी ट्रॉफी'वरून निर्माण झाला वाद, तेंडुलकर व गावस्कर संतापले

हेही वाचा : वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान वनडे सामन्यात भिडणार, स्पर्धा कधी? शेड्युल्ड जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+