Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान वनडे सामन्यात भिडणार, स्पर्धा कधी? शेड्युल्ड जाणून घ्या

ICC Women's ODI World Cup 2025 Schedule Announced : आयसीसीने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे असून संयुक्त यजमानपदाखाली वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत.

३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत जगातील अव्वल संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. विश्वचषकाचा उद्घाटन सामना ३० सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल.

ICC Women s ODI World Cup 2025

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार? (ICC Women's ODI World Cup 2025)

भारतीय पुरुष संघ आणि पाकिस्तान पुरुष संघ एकमेकांसोबत गेल्या काही काळांपासून द्विस्तरीय सामने खेळलेले नाहीत. (विश्वचषक वगळता) चॅम्पियन ट्राॅफीही त्रयस्त ठिकाणी झाली. आता महिला संघ पाकिस्तानशी विश्वचषकात भिडणार आहे. त्यानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे.

भारतात पाकिस्तानचा सामना नाही..

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

यंदा काय असेल वर्ल्डकपमध्ये खास

महिला एकदिवसीय विश्वचषक अनेक प्रकारे खास असणार आहे. बहुतेक सामने भारतात होणार आहेत, ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना थेट पाहण्याची संधी मिळेल. घरच्या परिस्थितीचा फायदा भारताला नक्कीच मिळेल, परंतु प्रत्येक सामन्यात कठीण स्पर्धा निश्चित आहे.

भारताच्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक (ICC Women's ODI World Cup 2025 Time Table)

  • ३० सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरू
  • ५ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान , कोलंबो
  • ९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - विशाखापट्टनम्
  • १२ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विशाखापट्टनम्
  • १९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड - इंदूर
  • २३ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड - गुवाहाटी २६ ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश - बंगळुरू २९ ऑक्टोबर: पहिला उपांत्य सामना
  • ३० ऑक्टोबर: दुसरा उपांत्य सामना - बंगळुरू
  • २ नोव्हेंबर: अंतिम सामना - (जर पाकिस्तान पात्र ठरला तर तो कोलंबोमध्ये होईल, अन्यथा बेंगळुरू अंतिम सामन्याचे आयोजन करेल)

हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण कुठे होणार?, 'या' प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दिसणार

हेही वाचा : PBKS vs RCB : ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला 'हा' बॅट्समन, टाॅप 5 मध्ये 4 भारतीय खेळाडू, पुर्ण यादी वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+