Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND Vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण कुठे होणार?, 'या' प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दिसणार

Where Are IND vs ENG Live Telecast : टीम इंडिया जून महिन्यामध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. टीम इंडियाला त्या ठिकाणी 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी लाईव्ह टेलीकास्ट संदर्भातील कोणाला अधिकार असणार आहेत, याची माहिती देखील समोर आलेली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार यापूर्वीच विकलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील सामने JioHotstar वर पाहता येणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या क्रीडा प्रसारकाने सोनीसोबत करार केला आहे. आता 20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणारी ही प्रतिष्ठित 5 कसोटी सामन्यांची मालिका जिओहॉटस्टारवर देखील आता पाहता येणार आहे.

ind vs eng

जिओकडून अद्याप नाही झाली घोषणा

क्रिकबझवर यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिओकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. तथापि, याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी आणि जिओहॉटस्टारमधील सध्याचा करार पुढील वर्षी व्हाईट बॉल सिरीजपर्यंत सुरू राहणार आहे. 2026 मध्ये भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पांढऱ्या चेंडूची मालिका खेळायची आहे. JioHotstar वर एकदिवसीय आणि टी-20 मधील एकूण आठ सामने देखील प्रसारित केले जातील.

सोनीने वेल्स क्रिकेट बोर्डासोबत केलेला आहे करार

सोनीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून 8 वर्षांसाठी प्रसारण हक्क विकत घेतले होते. हे 2031 पर्यंत राहतील. सोनी आणि जिओमधील सध्याच्या करारात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.

हा करार ईसीबीच्या संमतीने झाला आहे. आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. काही खेळाडू आधीच भारत अ संघाकडून मालिका खेळण्यासाठी तिथे गेले आहेत आणि तिथल्या वरिष्ठ संघात सामील देखील होणार आहेत.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना, २० जून, हेडिंग्ले
  • दुसरी कसोटी, २ जुलै, बर्मिंगहॅम
  • तिसरा कसोटी सामना, १० जुलै, लंडन
  • चौथा कसोटी सामना, २३ जुलै, मँचेस्टर
  • पाचवा कसोटी सामना, ३१ जुलै, लंडन
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+