BCCIमध्ये मोठा फेरबदल होणार!, रोहित-कोहली-जडेजाला केंद्रीय करारातील A+श्रेणीत स्थान मिळणार का?
Bcci Central Contracts, Rohit Sharma Virat Kohli and Ravindra jadeja : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप पुरुष खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर केलेले नाहीत. परंतु रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी T20 आंतरराष्ट्रीय स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर A+ श्रेणीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. तर त्यांना ए प्लस श्रेणीतून ठेवले जाऊ नये म्हणून नियामक मंडळातील काही लोकांचा विरोध देखील असल्याची चर्चा रंगली आहे.
महिला खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर
बोर्डाने सोमवारी महिलांच्या केंद्रीय कराराची यादी जाहीर केली. ज्यामध्ये तीन श्रेणींमध्ये 16 नावे आहेत तर पुरुषांची यादी पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वेळी पुरुषांच्या यादीत 30 नावे होती.
श्रेणीनिहाय खेळाडूंना किती पैसे मिळतात?
ए प्लस श्रेणीमध्ये रिटेनरशिप फी 7 कोटी रुपये आहे तर ए श्रेणीमध्ये 5 कोटी रुपये आहे. ग्रेड बी आणि ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3 कोटी आणि 1 कोटी रुपये दिले जातात. मुख्य प्रशिक्षक आणि सचिव (देवजीत सैकिया) यांच्याशी सल्लामसलत करून राष्ट्रीय निवड समिती केंद्रीय करार तयार करते. ते मंजुरीसाठी सर्वोच्च परिषदेसमोर ठेवण्यात येते.

दुसरीकडे, सर्व वरिष्ठ खेळाडूंना A+ श्रेणीत कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर सर्व भागधारकांचे एकमत नसल्याचे कळते. या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश आहे ज्यांचे स्थान तिन्ही फॉरमॅटच्या संघांमध्ये जवळजवळ निश्चित आहे.
कोहली, रोहित अन् जडेजाच्या निवृत्तीनंतर?
कोहली, रोहित आणि जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हे तिघेही आता दुहेरी स्वरूपाचे खेळाडू बनले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये संघात आपोआप स्थान मिळविण्यासाठी फक्त बुमराहच दावेदार आहे. तथापि, बीसीसीआयमधील एका प्रभावशाली गटाला A प्लस श्रेणीमध्ये यथास्थिती कायम ठेवायची आहे.
रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे तो अ श्रेणीत असणार नाही. इंग्लंड टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी नुकतेच उपकर्णधार म्हणून निवडण्यात आलेल्या अक्षर पटेलला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.
श्रेय्यस अय्यरचे पुन्हा पुनरागमन होणार का?
अक्षर हा एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघांचा नियमित सदस्य आहे आणि त्याने आतापर्यंत भारतासाठी 14 कसोटी सामने खेळले आहेत. गेल्या हंगामात संघातून वगळण्यात आलेला श्रेयस अय्यर या श्रेणीत पुनरागमन करण्यास सज्ज आहे. त्याने या हंगामात 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
केंद्रीय कराराच्या यादीत येण्यासाठी काय आहे निकष
कोणत्याही खेळाडूला केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी, त्याला एका कॅलेंडर वर्षात तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 सामने खेळावे लागतील. तरुण यशस्वी जयस्वालला त्याच्या श्रेणीतून बढती मिळते की नाही हे पाहणे देखील मनोरंजक असेल. त्याच्याकडे सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे.
या खेळाडूंना मिळू शकते स्थान
बंगालचा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीप (7 कसोटी), सरफराज खान (3 कसोटी) आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (5 कसोटी आणि 4 टी-20) यांना नवीन यादीत स्थान मिळणे जवळजवळ निश्चित आहे.
शार्दुल ठाकूर आणि ऋतुराज गायकवाड हे गेल्या वर्षीच्या यादीचा भाग होते, परंतु ते या यादीत स्थान मिळविण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करत नाहीत. तथापि, त्याच्या सहभागाचा निर्णय निवड समिती मुख्य प्रशिक्षक आणि सचिव यांच्याशी सल्लामसलत करून घेईल.












Click it and Unblock the Notifications