आशिया कपमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान टस्सल! दोन्ही संघाचे सामने अन् कधी होणार स्पर्धा? जाणून घ्या
Asia Cup 2025 : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात प्रचंड तणाव आहे. अशा स्थितीत भारताने पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकार यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही बंदी घातली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांनाही कमालीचा विरोध होत आहे. भारताने पाकिस्तानात न खेळण्याची भुमिका आधीपासूनच घेतली आहे.
यंदा 2025 ची पुरुषांची आशिया कप क्रिकेट स्पर्धा 17 व्यांदा होणार आहेत. त्या सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहेत. हे सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील. या स्पर्धेचा गतविजेता भारतीय संघ आहे.

कोणते संघ ठरले स्पर्धेसाठी पात्र?
या स्पर्धेत 6 संघांचा समावेश असेल. आशियाई क्रिकेट परिषदेचे 5 पूर्ण सदस्य, अफगाणिस्तान , बांगलादेश , भारत , पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि 2024 च्या एसीसी पुरुष प्रीमियर कपमध्ये अव्वल स्थान पटकावणारे संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामील होतील . स्पर्धेच्या तारखा जुलै 2024 मध्ये जाहीर करण्यात आल्या.
यंदा आशिया कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे अधिकृत आयोजक बीसीसीआय असून सुरुवातीला या स्पर्धा भारतात होणार होत्या, पण भारत-पाकिस्तान संबंधामुळे या स्पर्धा भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही एकाच देशात होतील ही शक्यता नाहीच. मग ही स्पर्धा कधी, कुठे आणि भारत -पाकिस्तान सामने कोणत्या तारखेला होणार हा प्रश्न असंख्य क्रीडा चाहत्यांच्या मनात आहे. आपण आज यासंदर्भात शक्यता आणि माहिती जाणून घेणार आहोत.
तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर इथे वाचा
आशिया कप स्पर्धा कधीपासून सुरु होणार?
टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्ताचा संदर्भ देत ई-सकाळने आपल्या वृत्तात म्हटले की, आशिया कप स्पर्धा 5 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे.
आशिया कप स्पर्धा कुठे होण्याची शक्यता आहे?
आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे होण्याची दाट शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धा कोणत्या प्रकारात खेळवली जाणार?
आशिया कप स्पर्धा क्रिकेटच्या टी-20 प्रकारात खेळवली जाणार आहे.
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे किती सामने कधी असू शकतात?
- आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यामध्ये ७ सप्टेंबरला पहिला सामना होऊ शकतो.
- साखळीसामन्यानंतर सुपर फोर फेरी होईल यामध्ये जर भारत पाकिस्तान संघ पोहचले तर त्यांचा सामना होऊ शकेल.
- त्याशिवाय दोन्ही संघ अंतीम सामन्यात पोहचल्यास आमने-सामने येतील. पाच सप्टेंबरपासून सुरु होणारी स्पर्धा २१ सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications