T20 World Cup: भारताला फायनल जिंकवून देणारा बापू
रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव, हा भारतीय बँटीगंचा तोफखाना निकामी झाला होता. ३४ धावांमध्ये तीन हुकमी एक्के बाद झाले होते. फायनमध्ये भारताची बत्ती गुल होईल असं वाटायला लागलं.
तसा क्रिकेटचा बादशहा असलेला विराट कोहली मैदानावर होता. पण त्याचा खराब फॉर्म आणि त्याला साथ कोण देणार हे प्रश्न डोंगरा येवढे होते. त्यावेळी मैदानात आला भारताचा संकट मोचक, देशाला फायनल जिंकवणारा बापू. होय अक्षर पटेल

षटकारांची आतषबाजी, फायनलमध्ये तब्बल चार सिक्स
आपल्या बोटांनी बॉलवर जादू करणाऱ्या अक्षरच्या हातात आता बॅट होती. हार्दीक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे चार ऑल राऊंडर भारताच्या ताफ्यात होते. झटपट विकेट जात असताना रोहित शर्माने अक्षर पटेल वर डाव लावला. पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल म्हणजेच बापू खेळायला आला. सुरुवातीलाच त्यानं खणखणीत चौकार लगावला. इरादे आणि मंजील ठरली होती.
आलेला बॉल सीमेपार घालवायचा हा निश्चय होता. मग सुरु झाला बापूचा जलवा. तो पाहून विराटही बॅक फूटवर राहिला. अक्षरने षटकारांची आतषबाजी केली. फायनलमध्ये तब्बल चार सिक्सर लगावत त्यानं रेकॉर्ड केला. एकतीस चेंडूत दीडशेच्या स्ट्राईकरेटने अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. डिकॉकचा डायरेक्ट थ्रो लागल्यानं अक्षर धावबाद झाला. तोपर्यंत भारताची धावसंख्या शंभरीपार गेली होती.
विराट कोहलीसोबत ७२ धावांची भागेदारी
चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि अक्षर पटेलनं ७२ धावांची भागेदारी केली. त्यामध्ये अक्षरचं योगदान होतं ४७ धावांचं यावरुन त्याच्या आक्रमक खेळीचा अंदाज येईल. अक्षर बाद झाल्यानंतर विराटने गिअर बदलला. दोन षटकार खेचत ७६ धावांची मोठी खेळी केली.. भारताला १७६ धावांपर्यंत पोहचवलं. शिवम दुबेची त्याला साथ भेटली.
हेनरिकनं अक्षरच्या एका ओव्हरमध्ये २४ धावा चोपल्या
बॉलींगसाठी मैदानात आल्यानंतर अक्षर पटेलने टिच्चून मारा केला. ३१ धावांवर खेळत असलेल्या स्टब्सला चकवा दिला आणि क्लिन बोल्ड केलं. तीन षटकं निट गेली.पण अक्षर पटेलच्या चौथ्या ओव्हरमध्ये हेनरिक क्लासेन नावाच वादळ खेळपट्टीवर उभं होतं. १५ व्या षटकांत तीन षटकार आणि एक चौकार. हेनरिकने ६ चेंडूत २४ धावा कुटल्या.
भारताचा खेळ खल्लास होणार असं वाटलं होतं. पण पुढे हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि सुर्यकुमारच्या भन्नाट खेळीने भारताने फायनल जिंकली. बापूने चिक्कार जल्लोष केला.
इंग्लंडसोबत सेमिफायनलमध्ये 'बापू'च्या बोटांनी जादू
ही झाली फायनलची गोष्ट, पण फायनलला पोहचवण्यातही अक्षर पटेल म्हणजे आपल्या बापूचा मोठा वाटाय. इंग्लंडसोबत झालेल्या सेमिफायनल सामन्यात बापूच्या बोटांनी जादू केली. जॉस बटलरला फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. त्यानंतर मोईन अलीला चकवा देत विकेटच्या मागे स्टंप आऊट केलं. तिसरा धक्का दिला जॉनी बेयरस्टोला शुन्यावर क्लिन बोल्ड करत.
हे तीन आक्रमक फलंदाज बापूने बोटावर नाचवले,त्यामुळे साहेबांचा डाव १०३ धावात गुंडाळला गेला. ६८ धावांनी भारताने सामना जिंकला. भारताला फायनलचं तिकीट मिळालं,सोबत दणदणीत विजयाचा तगडा आत्मविश्वास. फायनमध्ये बोटांची जादू चालण्या अगोदर बापू बॅट घेऊन संकटमोचक म्हणून उभा राहिला. निर्णयाक खेळी करत विश्वविजयात महत्वाचा वाटा उचलला.












Click it and Unblock the Notifications