T20 World Cup: मोदींपासून ते राहुल गांधी, भारतीय संघावर राजकारण्यांकडून कौतुकाचा वर्षाव
रोमहर्षक अंतिम सामन्यात भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला, आणि तब्बल 13 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश मिळालं. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची निर्णायक खेळी केली.
तर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह यांनीही चोख कामगिरी बजावली. या महत्वपूर्ण विजयानंतर टीम इंडियावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय नेतेमंडळी या स्पर्धेत मागे राहिली नाही. त्यांनी कौतुकाची थाप दिलीय.

राष्ट्रपतींकडून अभिनंदन
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू म्हणाल्या, " अंतिम सामन्यातील हा एक असामान्य विजय होता. पूर्ण सिझन टीम इंडियाने उत्तम खेळ दाखवला. आत्मविश्वास आणि चिकाटीने केल्याचं हे फळ आहे" अश्या प्रकारची पोस्ट राष्ट्रपतींच्या अकाऊंट वर पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
आम्हाला आमच्या भारतीय टीमचा अभिमान आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील ट्विट केला. ज्यामध्ये ते भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केल्याचं उल्लेख करत आहे. त्याचबरोबर लवकरच ट्रॉफी मायदेशी येईल, असे त्यांनी म्हटलंय.
CHAMPIONS!
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2024
Our team brings the T20 World Cup home in STYLE!
We are proud of the Indian Cricket Team.
This match was HISTORIC. 🇮🇳 🏏 🏆 pic.twitter.com/HhaKGwwEDt
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बोर्डाचे अध्यक्ष आहेत. शाह यांनी देखील टीम इंडियाचे विशेष अभिनंदन केले आहे.टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचे अभिनंदन करत असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक
भारतीय संघ आणि रोहित शर्मा, विराट कोहली यांचं अभिनंदन. सांघिक कामगिरीच्या जोरावर टीमने मोठं यश मिळवलं. अस एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ग्रेट टीम इंडिया...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2024
आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर...
दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ...
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. भारतीय संघाने समोर ठेवलेले १७७… pic.twitter.com/7e04cozE7w
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संघाला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांचा फेसबुक अकाऊंट वर या मॅचमध्ये असणाऱ्या काही प्रमुख क्षणांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर लोकांच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत. हा भव्यदिव्य आणि लक्षवेधी विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या अविश्वसनीय विजयावर भारतीयांना गर्व आहे. विराट कोहली, अर्शदिप सिंग, बुम्रा यांनी विशेष प्रदर्शन केले. भविष्यातील संघाच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा.
Congratulations to Team India on a spectacular World Cup Victory and a phenomenal performance throughout the tournament!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 29, 2024
Surya, what a brilliant catch! Rohit, this win is a testament to your leadership. Rahul, I know team India will miss your guidance.
The spectacular Men in… pic.twitter.com/lkYlu33egb
यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय T20 चषक जिंकता आला होता. जवळपास 17 वर्षानंतर संघाला T20 विश्वचषकात आपली छाप सोडता आली. चषक जिंकता आला, ही निश्चितच मोठी उपलब्ध आहे.
दरम्यान भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक केलेली T20 क्रिकेट मधील निवृत्तीची घोषणा मात्र निश्चित चटका लाऊन जाणारी आहे. यावर सध्या सोशल मीडियातून मते व्यक्त केली जात आहेत.












Click it and Unblock the Notifications