Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित शर्माने आयपीएल मधून बाहेर पडायला हवं, ही आहेत 3 कारणे

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आहे. रोहीतच्या बॅटमधून धावा निघत नाहीत आणि त्याला योग्य मान ही मिळत नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्मा सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तो क्रीजवर येताच बाद होऊन मैदानाबाहेर जात आहे.

केकेआर विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. हा सामना जरी मुंबई इंडियन्सने जिंकला असला तरी पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या कर्णधाराला आता संघात मान-सन्मान दिला जात नाही. पहिल्या सामन्यापासून हे दिसून येत आहे.

Rohit Sharma

गेल्या वर्षी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आल्यावर क्रिकेट चाहते चांगलेच संतापले होते. हार्दिक पंड्याच्या वर्तन अजूनही मैदानावर योग्य वाटत नाहीत. बॉसगिरीची वृत्ती अजूनही आहे. या कारणास्तव रोहित शर्माला या संघात राहायचे नव्हते, परंतु त्याला पुन्हा एकदा रिटेन करुन चूक केली आहे. रोहितने आयपीएलमधून बाहेर पडावे, याची ही 3 कारणे आहेत.

पहिले कारण

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा संघाला विजयी केले आहे. पण आता त्याचा वापर फक्त एक इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला जात आहे. इतक्या मोठ्या खेळाडूसोबत असे करणे चुकीचे आहे. विराट कोहली हा आरसीबीचा कर्णधार नाही पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते. रोहितसोबत घडत असलेले हे वर्तन चांगले चालत नाहीये.

दुसरे कारण

दुसरे कारण म्हणजे रोहित शर्माला कदाचित लिडरशिप गटात स्थान नाही. रोहित शर्मा ड्रिंक्स किंवा इतर प्रसंगी नेतृत्वाबद्दल बोलताना दिसत नाही. तो हार्दिक पंड्यापासून दूर दिसतो. तो ड्रेसिंग रूममध्ये बसून मैदानावर झालेल्या चुकांबद्दल इतर लोकांशी चर्चा करताना दिसत आहे.

तिसरे कारण

आगामी सामन्यांमध्येही रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. त्याचा फॉर्म त्याला साथ देत नसल्याने त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीतून वगळले जाण्याचीही शक्यता आहे. जर रोहित निवृत्ती घेऊन मुंबई इंडियन्स सोडू शकत नसेल तर तो फिटनेचा मुद्दा उपस्थित करून संघ सोडू शकतो.

Take a Poll

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+