Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटीचं बक्षीस 'या' खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी

मुंबई- सुमारे सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करुन भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोसच्या मैदानावरुन टीम इंडिया आता मायदेशी परतली आहे. बीसीसीआयने विश्वविजेत्या संघाला 125 कोटींचे बक्षिस जाहिर केले आहे. या पैशाने संघातील प्रत्येक खेळाडू मालामाल होणार आहे.

Team India

ज्या बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना झाला तेथे वादळ होते. त्यामुळे भारतीय संघाला भारतात परतण्यास उशीर झाला. आता भारतीय संघ मायदेशी परतला आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली. वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी बीसीसीआयने टीम इंडियाकडे 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ही बक्षीस रक्कम संघातील खेळाडू, क्रीडा कर्मचारी आणि राखीव खेळाडूंना वाटप करण्यात येणार आहे. आयसीसीनेही भारतीय संघाला सुमारे 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे.

कुणाला किती मिळणार?

खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रकमेवर कर आकारला जातो. बक्षिसाच्या रकमेवर 3 टक्के टीडीएस आधीच कापला जाईल. या संपूर्ण रकमेवर साधारणः 30 टक्क्यांपर्यंत कर कापून उर्वरित रक्कम खेळाडूंना दिली जाईल.
125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम संघातील 15 सदस्य, 4 राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सुमारे 15 सदस्यांमध्ये विभागली जाईल. यामध्ये संघातील प्रमुख 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय सपोर्ट स्टाफ आणि उर्वरित चार राखीव खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाऊ शकतात, असा अंदाज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+