Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ज्यांच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो, ते 'कुसुमाग्रज' नेमके कोण आहेत, वाचा सविस्तर

Who is Kusumagraj : महाराष्ट्रभरात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. प्रत्येक मराठी व्यक्तीला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. व्यक्तीला मराठी भाषांचे सार्थ अभिमान आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा सगळीकडे प्रसिद्ध आहे.

मराठी भाषा समृद्ध करण्याचे आणि जगभरात पसरवण्याचे काम अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. भारतातील प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषा सगळ्यात उच्च मानली जाते. शिवाय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे हीच मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी आणि मराठीचा आदर व्हावा, यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी 27 फेब्रुवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषण, निबंध स्पर्धा, लेखन, एकांकिका इत्यादी अनेक गोष्टींचे आयोजन केले जाते.

Kusumagraj

मराठी भाषा दिन का साजरा केला जातो?

मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांच्या वाढदिवसांनिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. शासन निर्णयानुसार, कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेतला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा 27 फेब्रुवारी रोजी "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला होता. कवी कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून सर्वदूर मोठी ख्याती आहे. त्यांनी मराठी भाषांचे सन्मान वाढवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

Marathi Bhasha Gaurav Din 2025

मराठी साहित्यीक कवी 'कुसुमाग्रज' यांच्याविषयी जाणून घ्या?

मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिकमध्ये झाला. कवी कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर हे आहेत. तसेच कुसुमाग्रजांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. गजानन शिरवाडकर यांचे काका विष्णू शिरवाडकर यांनी कुसुमाग्रजांना दत्तक घेतले होते. त्यानंतर त्यांचे नाव बदलण्यात आले.

विष्णूं शिरवाडकर यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती. तिचा भाऊ म्हणजेच कुसुम अग्रज म्हणून त्यांनी त्यांचे टोपण नाव 'कुसुमाग्रज' असे ठेवले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावला तर माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुढील मॅट्रिक शिक्षण मुंबई विद्यापीठातून केले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. 'रत्नाकर' नावाच्या मासिकातून कुसुमाग्रज यांची पहिली कविता प्रसिद्ध करण्यात आली.

कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य

कवी कुसुमाग्रजांचे खूप मोठे साहित्य आहे. त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या कविता, कथा, नाटकांविषयी लिहताना शब्द अपुरे पडतील एवढे मोठे साहित्य आहे. अजूनही त्यांच्या अनेक कविता सगळ्यांच्या ओठी असतात. त्यांच्या कवितांमुळे अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळते. चला तर जाणून घेऊया कुसुमाग्रज यांच्या कवितांबद्दल सविस्तर माहिती.

कोणत्या व किती कवितांचे केले लिखान?

कुसुमाग्रजांच्या अनेक कविता खूप कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आजही त्यांचे कविता संग्रह अभ्यासले जातात. अक्षरबाग (1999),किनारा(1952), चाफा(1998),छंदोमयी (1982),जाईचा कुंज (1936),जीवन लहरी(1933),थांब सहेली (2002),पांथेय (1989),प्रवासी पक्षी (1989),मराठी माती (1960),महावृक्ष (1997, माधवी(1994), मारवा (1999), मुक्तायन (1984. मेघदूत(1954), रसयात्रा (1969),वादळ वेल (1969),विशाखा (1942),श्रावण (1985),समिधा (1947),स्वगत(1962), हिमरेषा(1964)

मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व

मराठी भाषेला भारतासह इतर सर्व देशांमध्ये सन्मान केला जातो. हा दिवस मराठी साहित्याचे सन्मान करणारा दिवस आहे. तसेच समकालीन इंडो-आर्यन भाषांपैकी मराठीमध्ये अनेक साहित्य आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी सगळ्यात पहिली भाषा मराठी आहे.

1999 मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. याआधी मराठी भाषा महारथी, महाराष्ट्री, मराठी किंवा मल्हाटी म्हणून ओळखली जात होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+