Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना आधी का डावललं, आता मंत्रिपद का दिलं? जाणून घ्या 'हे' 3 कारणं
Why Chhagan Bhujbal given ministerial post Know the 3 reasons : "मला सांगण्यात आलं की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझा समावेश होईल. मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा होईल." हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे.. या वक्तव्यामुळे आता निश्चित झाले होते की, छगन भुजबळ हे मंत्री होणार आणि त्यांनी आज 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्याच्या राजकारणात ओबीसींचे नैतृत्व छगन भुजबळ करत आहेत. ओबीसींचे नेते म्हणून त्यांचा मोठा दबदबाही राजकारणातआहे, आता ते मंत्री झाले आहेत. पण मुद्दा हा आहे की, छगन भुजबळांना आधी डावलले आणि आता मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी स्वीकारले असे का घडले? पुन्हा त्यांना मंत्रीपद देण्याचे कारण काय हे आपण जाणून घेऊया.

दिग्गज नेते शरद पवार यांच्या पक्षाशी काडीमोड घेत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी घेतली, तेव्हापासून छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास फारसा प्रभावी ठरला असे म्हणता येणार नाही.या काळात मात्र संघर्ष त्यांचा वाढताच होता आणि त्यांनी तो समर्थपणे केला हेही तितकेच खरे.
आधी छगन भुजबळांना का डावलले?
अजित पवारांसोबत आल्यानंतर साहाजिकच छगन भुजबळ पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या छायेत आले स्वतंत्र विचार घेऊन आपले मुद्दे मांडत आहेत. कधी -कधी तर ते सरकारसोबत भांडतानाही दिसले तर कधी उघड टीका आणि संघर्षही त्यांनी केला. छगन भुजबळ हे भाजपमधील आणि शिवसेनेतील काही नेत्यांना नको होते, तेव्हापासून त्यांची पिछेहाट सुरु झाली दरम्यान आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
छगन भुजबळ यांचा आधी मंत्रिमंडळात समावेश का केला नाही?
छगन भुजबळ यांनी बच्चू कडू यांच्यासारखीच सत्तेत असताना सरकारवर टीका करणे सुरु केले होते. यामुळे सरकारमधील घटक पक्षातील नेते नाराज होते. दरम्यान मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन बरेच हेवेदावे झाले. निवडणुकीआधी भुजबळ मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांच्या अजेंड्यावर होते. त्यांना तात्काळ मंत्रिपद देऊन सत्तेत नव्याने बसलेल्या सरकारला मराठा - ओबीसी वाद वाढवायचा नव्हता उलट तो थांबवायचा होता, तसेच निवडणुकीनंतर लगेचच भुजबळांना मंत्री करुन मराठा आंदोलकांचा रोष पत्करायचा नव्हता, कारण मराठा आंदोलन शांत ठेवायची ही सरकारची निती आहे, म्हणून त्यावेळी छगन भुजबळ यांना जवळ केले गेले नव्हते.
आता छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात का समावेश होत आहे?
1. तूर्त मावळलेला मराठा - ओबीसी आरक्षण संघर्षाचा वाद
मराठा आरक्षणासाठीची आंदोलने आता फार जोमात नाहीत, अशातच छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे घेत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवरील थेट टिका करणे टाळले आहे. टीका जर झाली तर सरकार अडचणीत सापडते पण आता या टिका होताना दिसत नाही. परिणामी मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद तूर्त थांबलेला आहे. अशातच वेटींगवर ठेवलेल्या छगन भुजबळ यांना संधी देण्याची ही योग्य वेळ होती.
2.ओबीसींची मते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. महाराष्ट्रात महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसींची साथ मोठ्या प्रमाणात लाभली पण त्यांच्या नेत्याला मंत्रिपदापासून दूर ठेवणे फार दिवस परवडणारे नव्हते. त्यातच छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड केली होती. देवेंद्र फडणवीस यांना फोनही केले भेटही घेतली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसींची मते महायुतीच्या विजयात महत्वाचे ठरतील आणि त्यासाठी मंत्रिमंडळात भुजबळ हवे हे एक कारण आहे.
3. राष्ट्रवादीच्या कोट्यातीली मंत्रिपदाची जागा भरुन काढणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी वाद टाळण्यासाठी अजित पवार यांनी त्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खाते स्वःतकडेच ठेवले होते. धनंजय मुंडेंची जागा किती दिवस रिक्त ठेवायची अन् आता स्थानिक निवडणुकाही होणार. त्या अनुशंगाने ही जागा भरुन काढण्यासाठी छगन भुजबळांसारखा महत्वाचा आणि शक्तिशाली नेता नाही हे राष्ट्रवादीलाही माहित आहे. त्यामुळे नाराज छगन भुजबळ यांना खूश करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केले जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत भुजबळ किती मतांनी विजयी झाले होते?
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. माणिकराव शिंदे यांना 1 लाख 8 हजार 2 मतं पडली होती तर 1 लाख 34 हजार 154 मतं पडली होती. छगन भुजबळ हे 26 हजार 152 मतांनी विजयी झालेले आहेत.












Click it and Unblock the Notifications