स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? 4 मुद्द्यात जाणून घ्या इतिहास, स्थापना, उद्देश अन् कोण होते जनक?
What is Local Self Goverment : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे बऱ्याच कालखंडापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात आता दिवाळीपुर्वी किंवा दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात. राजकीय पक्ष आतापासूनच या निवडणुकीची पुर्वतयारी करत आहे पण बहुतांशजणांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, त्यांचे कार्य आणि त्याचा इतिहास माहिती नाही आज आपण या लेखातून चार मुद्यांत सर्व माहिती समजून घेणार आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय?
नागरिकांच्या जवळची त्यांच्या दैनंदिन गरजा, त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करणारी शासकीय व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामस्तर ते तालुका आणि शहराचा समावेश होतो. गाव तालुका आणि शहरानुसार त्या त्या ठिकाणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची घटक संस्था असतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, कटक मंडळे, नगरपंचायती, विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना कधी झाली? इतिहास काय..
बलवंतराय मेहता समीतीची स्थापना केली. मेहता समितीने तीन स्तरांच्या स्थानिक स्वराज्याची कल्पना मांडली. ग्रामपंचायत तालुका, पंचायत व जिल्हा परिषद यांकडे अधिकर विषयक अनेक शिफारशी केल्या. तिच्या शिफरशी नुसार भारतात प्रथम पंचायतराजची स्थापना राज्यस्थान मध्ये ०२ ऑक्टोबर १९५९ रोजी करण्यात आली. त्यानंतर देशातील अनेक राज्यांनी स्थानिक शासन विषयक कायदे केले.
तत्कालीन महसूलमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली १९६० मध्ये समिती नियुक्त करण्यात आली. नाईक समितीने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पुनर्विचार करून आपल्या शिफारशी सादर केल्या. या शिफारशीवरच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मंजुर केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्देश काय आहे?
भारतातील लोकशाही प्रणाली भक्कम करण्यासाठी आणि शासन दिल्लीपासून गल्लीपर्यंत समान पातळीवर सेवा देण्यासाठी तसेच खंडप्राय देशातील प्रत्येक गाव ते शह सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी सरकारने लोककल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. नागरिकांच्या जवळची त्यांच्या दैनंदिन गरजा, त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करणारी शासकीय व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण?
स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांचे नाव घ्यावे लागेल. लॉर्ड रिपन, ज्यांनी १८८० ते १८४४ पर्यंत भारताचे व्हाईसरॉय म्हणून काम केले होते. त्यांनी १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव मांडला, हा ठराव पारित झाल्याने ज्याने भारतातील नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. त्यातून भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला बळ मिळाले. हा ठराव "स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा जाहीरनामा" म्हणून ओळखला जातो.












Click it and Unblock the Notifications