राज्यातील या 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा

मुंबई : आज राज्यात अती मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

Mumbai Rain

रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तो महत्वाचं काम नसेल घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे या सहा जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


मुंबईसह 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत 22 जुलैपर्यंत पर्यंत पुढील चार दिवस हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात देखील चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पुर आल्याचं समोर आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+