राहुल गांधी, खर्गे यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार? विनोद तावडे यांनी पाठवली नोटीस
Vinod Tawde Virar case- भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसच्या नेत्यांनीही विरार येथील हाँटेलमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तावडे यांच्यावर जोरदार टिका केली होती. आता विनोद तावडे यांनीही हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं दिसत आहे. विनोद तावडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवत, या प्रकरणात माफी मागा नाहीतर, 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकेल, असा इशारा दिला आहे. या प्रकारानंतर विरार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

विनोद तावडेंनी पाठवली नोटीस
विरार येथील हॉटेलमधील घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी ट्विटरवरुन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली होती. आता विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागा, नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकू, असा इशाराच तावडे यांनी दिला आहे. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 24 तासांत बिनशर्त माफीचा पर्याय विनोद तावडेंकडून देण्यात आला आहे. अन्यथा, 100 कोटींची मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी म्हटलंय. तावडे यांनी आपल्या नोटीसमध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टचा उल्लेख करत आपली नाहक बदनामी झाल्याचं म्हटलं आहे.
कांग्रेस का एक ही काम है झूठ फैलाना!
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 22, 2024
नालासोपारा वाले झूठे मामले में मैंने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गाँधी और पार्टी प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत को मानहानि का नोटिस भेजा है, क्योंकि उन्होंने इस मामले में झूठ फैलाकर मेरी और भारतीय जनता पार्टी की छवि को नुकसान… pic.twitter.com/ZO75yKSx8m
काय झालं होतं विरारच्या हाँटेलमध्ये?
विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी भाजप नेते विनोद तावडे हे विवांत हॉटेलमध्ये गेले होते. तेथे भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरू असताना, बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला. त्यांनी सगळं तपासलं, पण काहीच पैसे मिळालं नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी म्हटलं होतं.
हितेंद्र ठाकुरांनी केले होते आरोप
विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, आम्ही येथे आलो त्यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असं का केलं, हे त्यांनाच विचारा...सीसीटीव्ही बंद केला, त्यामुळे हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी देखील मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. असंही हितेंद्र ठाकूर त्यावेळी म्हणाले होते.












Click it and Unblock the Notifications