'एक है तो सेफ है, धारावीसाठी काँग्रेसच्या डोक्यात शेख आहे; राहुल गांधींच्या प्रेसनंतर भाजपचा पलटवार
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी व महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपकडून देखील पलटवार करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर निशाणा साधला. फेक माहिती देऊन राहुल गांधी हे महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एक है तो सेफ है, धारावीसाठी काँग्रेसच्या डोक्यात शेख आहे, असा हल्लाबोल विनोद तावडे यांनी केला.
कॉंग्रेस काळातच अदाणीचा विकास
विनोद तावडे म्हणाले की, मुळात अदाणी आणि काँग्रेसचे नातं जुनं आहे. काँग्रेस काळातच अदाणींचा खरा विकास झालेला आहे, हे विधान स्वत: अदाणींनी एका मुलाखतीत केले होते. त्यामुळे आता राहुल गांधी हे अदाणींना नेमका विरोध का करत आहेत, याचा प्रश्न आम्हाला पडला आहे.

राहुल गांधी हे जनतेची दिशाभूल करत आहेत
विनोद तावडे म्हणाले की, एक है तो सेफ है ही घोषणा मोदींनी दिली. जाती-जातीत विभागू नका असा नारा मोदींनी दिलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये एक राहिले असते तर तिथे विकास झाला असता. हा नारा सकारात्मक आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी देखील पॉझिटिव्ह घ्यावा. परंतु ते चुकीच्या पद्धतीने या नाऱ्याला घेऊन लोकांमध्ये जाऊ लागले आहेत.
धाराविकरांना पक्क घर न मिळू देणे हा कॉंग्रेलचा डाव
महाविकास आघाडीच्या काळातच अदानींना धारावीची जमीन विकसित करण्यासाठी अदानी यांच्या कंपनींना टेंडर देण्यात आले. तर दुसरी कंपनी ही अबुधाबीतील एका व्यक्तीची होती. रेल्वेची जमीन होती त्या टेंडरमध्ये बदल करून जमीन विकसित करण्यासाठी दिली आहे. धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर दिले जाणार आहे. सर्व इंडस्ट्रीयल आणि कर्मिशअल जागा दिली जाणार आहे.
परंतु, धारावीकरांना पक्क घरं मिळाले नाही पाहिजे, ही राहुल गांधींची ही धारणा आहे. एक है तो सेफ है, धारावी के लिए इनके दिमाग मे शेख है. धारावीतील कोणती गोष्ट धारावीतील लोकांच्या विरोधात आहे, यावर राहुल गांधी सांगू शकले नाहीत.
महाराष्ट्रातून एकही उद्योग गेला नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवावं
गुजरातमध्ये येथील उद्योगधंदे नेले गेले, असा आरोप त्यांनी केला. त्यावर स्वर्गिय रतन टाटा यांनी उद्योगधंदे संदर्भात ट्विट केले होते. फोक्सकॉन हे मविआच्या काळातच बाहेर गेले आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
विनोद तावडे म्हणाले की, महायुतीच्या काळात एकही प्रकल्प गुजरातला गेला नाही. माझं राहुल गांधी यांना आव्हान आहे की, त्यांनी येथे सिद्द करून दाखवावं. उलट सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आहे. 29 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आहे.
राहुल गांधी हे महाराष्ट्रातील जनतेला फेक पद्धतीने माहिती देत आहेत. मुळात सर्वाधिक ग्रोथ ही अदानी यांची कॉंग्रेसच्या काळात घडली आहे.
एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है
धारावीची जमीन अदानीला देणार, असे राहुल गांधी म्हणतात. मात्र खरे असे आहे की ही जमीन महाराष्ट्र सरकारकडेच राहणार आणि ज्याने ते टेंडर घेतले त्याला ती जागा जाणार, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. या टेंडरमध्ये एक कंपनी अदानीची होती, एक कंपनी ही अबू धाबीमधली होती, त्यात ज्याला टेंडर मिळाले त्याला हे काम देण्यात येणार आहे. धारावीमध्ये जे लोक राहतात त्या सर्वांना घरे मिळणार, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आता धारावीच्या जागेसाठी अबू धाबीच्या शेखची सुद्धा कंपनी होती, मात्र, त्यांना ते मिळाले नाही. मग आम्ही असे म्हणायचे का एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है, असे म्हणायचे का आम्ही? असा सवालही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरेंना केले आव्हान
आज प्रचारसभा संपत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे. कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरेंना मा. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हणायला तयार नाहीत. हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? प्रियंका गांधी इथे आल्या, प्रियंकाजी जमात ए इस्लामी या संस्थेच्या अधिकृत सहकाऱ्याने निवडणूक लढवत आहेत, जी संस्था म्हणते की आम्हाला भारतात इस्लामिक शासन आणायचे आहे, उबाठाला हे मान्य आहे का? हा आमचा प्रश्न आहे.
मतदान करण्याचे केले आवाहन
तावडे म्हणाले की,ल इंदिरा गांधी यांनी गरीबी हटाओचा नारा दिला पण मोदींनी 25 कोटी लोकांना गरीबी रेशिओतून बाहेर आणले. मोदी सरकारने केले केलेले काम आणि महायुती सरकारने केले काम हे जनतेने विचार करून लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं, असा आमचा आग्रह आहे. महाविकास आघाडी व महायुती यांचा प्रचार शिगेला पोहोचल्यानंतर महायुतीचे पारडं जड आहे. तरी देखील महायुतीचे सरकार आले पाहिजे, त्यासाठी मतदानाचा टक्का कमी झाला तर राज्याचा विकास खुंटेल. त्यामुळे जनतेला विनंती आहे की, लोकांनी येथे येऊन मतदान करावं, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications