उत्तराखंडमध्ये ढगफुटी: उत्तरकाशीतील धराली गावात हाहाकार, घरे आणि हॉटेल्स वाहून गेली
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. धराली गावात झालेल्या या ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकाने वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ५० लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?
- ही घटना उत्तरकाशीतील हर्षिलजवळ असलेल्या खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात घडली. अचानक ढगफुटी झाल्याने नदीला मोठा पूर आला आणि पाण्याचा प्रचंड लोंढा गावाच्या दिशेने धावला.
- अवघ्या काही क्षणांतच पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी संपूर्ण गावावर ताबा मिळवला. या लोंढ्यामुळे अनेक घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.
- या दुर्घटनेत सुमारे २० हॉटेल्स आणि होमस्टेचे मोठे नुकसान झाले आहे.
- गंगोत्री धामकडे जाणारा मुख्य रस्ताही या घटनेमुळे बाधित झाला आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
- घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, लष्कर, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) ची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत.
- बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
- या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले असून, त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे.
- उत्तराखंड सरकारने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
- प्रशासनाने लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, कारण या भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने मदत आणि बचाव कार्यासाठी हेल्पलाइन क्रमांक (०१३७४-२२२१२६, २२२७२२, ९४५६५५६४३१) जारी केले आहेत.












Click it and Unblock the Notifications