मोदी, शहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईला अदानी सिटी करण्याच डाव आहे. ते धारावी अदानींच्या घशात घालत असून ते नागरी संतूलन बिघडवत आहे असा आरोप करत मुंबईला लुटायचे कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

जागा अधिगृहीत करण्याचा कट

उद्धव ठाकरे म्हणाले की, अदानींना वारेमाफ एफएसआय दिला जात आहे. धारावीचा प्रकल्प अदानींना देत सरकार त्यांच्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा अधिगृहीत करुन त्यांना देत आहे हा प्रकार काय आहे. पात्र-अपात्रेतेचा कट करीत धारावीची जागा मिळवायचा सरकारचा कट आहे. हा प्रकार त्यांच्या मित्रासाठी आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi

अदानींचे टेंडर रद्द करा

उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीच्या झोपडपट्टीधारकांना पात्र-अपात्र कशाच्या आधारावर ठरवत आहात असा सवाल करीत सरकार फसवणूक करीत आहे. हे टेंडर रद्द होऊ शकते. अदानीसाठी मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर ते टेंडर रद्द करा. अदानींनीही हे टेंडर सोडून द्यावे पुन्हा टेंडर काढा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई घशात घालण्याचा डाव

उद्धव ठाकरे म्हणाले, अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे, तो शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार आहे. एकूणच नागरी सुविधांवर भार पडणार तो उचलणार कोण, त्याचे पैसे कोण देणार, पिण्याचे पाणी त्याचा खर्च हे सर्व अदानी देणार आहेत का. त्यांना जर हे झेपत नसेल तर टेंडर रद्द करा. धारावीकरांना उद्धवस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही.

धारावीकरांना आमचे वचन

उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीची शाळा, रुग्णालय कुठे होणार, कोळीवाड्याचे काय करणार याचा कुठेच उल्लेख नाही. टेंडर नियमबाह्य नाही पण आताच्या सोईसुविधा नियमबाह्य आहे. भविष्यात आमचे सरकार आले तर आमचे धारावीकरांना वचन आहे की, तुम्ही जिथे आहात तिथेच हक्काचे घर देऊ. तिथेच रोजीरोटीचा विचार करु

मुंबईचे नागरी संतूलन बिघडेल

उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीकरांना हाकलून द्यायचे आणि मुंबईचे नागरी संतूलन बिघडवायचे हे कारस्थान आहे. टोलनाक्याची जागाही अदानींना देणार मग हा प्रकल्प किती वर्ष चालणार, या लोकांनी कसे राहायचे तोपर्यंत अदानी हे या लोकांच्या रोजीरोटीचा विचार करणार आहेत का. हे टेंडर का रद्द करु नये याचे उत्तर या सरकारने द्यायला हवे असेही ठाकरे म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+