'बटेंगे तो कटेंगे' म्हणणारे आता 'सौगात ए मोदी' म्हणून लागलेत; उद्धव ठाकरेंच्या वादळी PCतील 10 मुद्दे
Uddhav Thackeray Press Conference on Narendra Modi-Eknath Shinde Read 10 Points : भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा देणारे आता सौगात ए मोदी म्हणत आहेत.
मोदी सुरुवातीला मंगळसूत्र धोक्यात आहे?, आता हिंदूंचे संरक्षण कोण करणार?, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर भाजपाला देखील जोरदार टोला लगावला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे म्हणाले की, जे लोक आमच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते आता काय म्हणतील. भाजपने आता आपण हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी. भाजपने प्रथम विष वाटले, आता धान्य वाटत आहेत?, पण त्यांनी आपले हिंदुत्व सोडले का किंवा त्यांची ही योजना केवळ बिहार निवडणुकीपर्यंतच राहणार का? हे भाजपने स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

1) प्रचंड बहुमत मिळवणारे अस्वस्थ सरकार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार हे प्रचंड बहुमत मिळवणारे एक अस्वस्थ सरकार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाद्वारे या सरकारने केवळ आपले अपयश व अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला, असा टोला त्यांनी लगावला.
2) शंभर दिवसात सरकारने नेमकं काय दिले?
ठाकरे पुढे म्हणाले की, काल संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सरकारचे अपयश व अस्वस्थता लपवणारे होते. सरकारने 100 दिवसांत सरकार काय करणार? असा संकल्प केला होता. पण सरकारला या संकल्पाचा विसर पडला. ते या 100 दिवसांतील एकाही आराखड्यावर बोलले नाही किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. महायुती सरकार आल्यानंतर राज्यात खून, बलात्कार या घटनांमघ्ये वाढ झाली, असेही ते म्हणाले.
3) अधिवेशन कबरीपासून कामरापर्यंतच चालले
उद्धव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षानंतर शांत असणाऱ्या नागपुरात दंगल झाली. मुख्यमंत्री या प्रकरणी सर्वांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या (एकनाथ शिंदे) मनात अजूनही मुख्यमंत्रीपदाचे जे काही कोंब फुटले आहेत, नको तिथे, ते कोंब अजूनही जात नाहीत. ते त्यांना छळतात की काय? हा एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला असावा असे वाटते.
4) या अधिवेशन काळात राज्याला फक्त गाणं मिळालं
हे अधिवेशन का घेतले गेले? हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारला पाहिजे. या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले? तर या अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला व महाराष्ट्राला एक चांगले गाणे दिले असे म्हणावे लागेल. हे गाणे आज सर्वांच्या ओठांवर आहे. हेच या अधिवेशनाचे एक फलित मानावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
5) या सरकारला बहुमताचा माज चढलाय!
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत विरोधक राज्यपालांकडे सरकारची तक्रार घेवून गेले होते. पण यावेळी ते गेले. सत्ताधारी आपल्या पाशवी बहुमताचा माज कसा दाखवत आहेत, आम्हाला काही बोलू दिले जात नाही, याची तक्रार त्यांनी राज्यपालांकडे केली. हे असे अधिवेशन होते. सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणावा लागला.
6)खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा, अशी गत
सरकारने आपले काम निटपणे केले असते तर मला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. पण खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा अशी गत या सरकारची झाली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या. पण पूर्तता काहीच नाही. सरकारने भोळ्याभाळ्या जनतेला थापा मारून फसवले, असाही टोला त्यांनी लगावला.
7) शिवसेना एकच, 'एसंशि' हा फक्त एक गट
उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची 'एसंशि' असे म्हणत हेटाळणी केली. शिवसेना एकच आहे. एसंशि (एकनाथ संभाजी शिंदे) हा एक गट आहे. त्यामुळे त्या गद्दार गटावर मी काही बोलणार नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केले. हा समाज आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यांनी लगेचच ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली. पण आता बोगस हिंदुत्ववाद्यांना बरोबर पाचर बसली आहे, असे ते म्हणाले.
8) कुणाल कामराचे वकीलपत्र घेतले नाही?
उद्धव ठाकरे यावेळी कुणाल कामराच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादावरही भाष्य केले. कुणाल कामरा काय बोलतोय त्यावर मला बोलायचे नाही. मी त्याचे वकीलपत्र घेतले नाही. पण त्याने कुणाचेही नाव घेतले नाही. त्यावर भाजप प्रतिक्रिया देत आहे. ज्यांचे नाव घेतले ते यावर काहीही बोलत नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
9) अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण केला जात आहे. त्याच्यावर इतिहासकारांचे मत जाणून घ्या. पण अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होणार होते. त्याचे काय झाले? असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.












Click it and Unblock the Notifications