उद्धव ठाकरेंनी सोडले बाळासाहेबांचे विचार, विरोधकांशीच केली आघाडी
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अजब रसायन होते. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व यांचा अपूर्व संगम म्हणजे बाळासाहेब ठाकरे. पाठीशी कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि बघता बघता महाराष्ट्र काबीज केला.
बेदरकार आणि बेफिकीर असे राजकारण बाळासाहेबांनी केले. परिणामांची पर्वा कधीही न करणारा आणि दिल्या शब्दाला जागणारा दिलदार राजकारणी म्हणून संपूर्ण भारत बाळासाहेब ठाकरे यांना ओळखतो. पण त्यांच्या कर्तृत्वाला आणि विचारधारेला त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी सुरुंग लावल्याचे दिसून येते.

बाळासाहेब ठाकरे हे स्वतःच्या मर्जीने आणि सवडीने राजकारण करणारे नेते होते. राजकीय नफा-तोट्यासाठी ते कधीही कुणाचीही पायरी चढली नाहीत. भारतातले बडे बडे नेतेच नाहीत तर विदेशातील नामांकित मंडळी सुद्धा मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटल्याशिवाय जायची नाही. राजकीय चर्चांसाठी बाळासाहेबांनी कधी हॉटेलमध्ये बैठका घेतल्या नाही. मातोश्रीवरून आदेश निघाला की ती काळ्या दगडावरची रेघ असायची. बाळासाहेबांनी मातोश्रीचा आब ठेवला होता.
शिवसेना भाजपा युती अस्तित्वात असेपर्यंत भाजपच्या नेत्यांनी ही परंपरा कायम राखली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा राजकीय वाटाघाटीसाठी मातोश्रीवरच गेले होते. 2019 साली सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि मातोश्रीची सगळी प्रतिष्ठान नंतर धुळीला मिळाली. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राजकीय गणिते जमवण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बैठका घेऊ लागले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकांत सहभागी झाले., सिल्वर ओकवर सकाळ दुपार संध्याकाळ दिसू लागले. अगदी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीही घेऊन आले. बाळासाहेबांनी असे प्रकार कधीच केले नव्हते. त्यांच्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा ही राजकीय फायदा तोट्यापेक्षा अधिक होती.
उद्धव ठाकरे यांची विरोधकांशीच हातमिळवणी
बाळासाहेब ठाकरे हे दिलदार आणि उद्या स्वभावाचे नेते होते. त्यांची अनेक लोकांशी घनिष्ठ मैत्री होती. पण ही घनिष्ठ मैत्री बाळासाहेबांनी कधीही राजकारणात आणली नाही.मैत्री आपल्या ठिकाणी आणि राजकारण आपल्या ठिकाणी हीच बाळासाहेबांच्या राजकारणाची पद्धत होती. शरद पवार हे तसे बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे मित्र. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी एक नियतकालिक एकत्र काढले होते. त्याचा पहिला अंक निघाला आणि नंतर ते कधीच निघू शकले नाही. सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाच्या प्रवेशाच्या वेळी बाळासाहेबांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. ही बाळासाहेबांनी शरद पवार यांची व्यक्तिगत मैत्री होती. पण म्हणून शरद पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही राजकीय सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणून आपलेसे केले नाही.
बाळासाहेब भाजपवरही टीका करायची. पण राजकीय फायद्यापेक्षा विचारधारा अधिक महत्त्वाची याबद्दल बाळासाहेब ठाम होते. 1999 ते 2014 असा प्रदीर्घ काळ शिवसेना सत्ते बाहेर होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे फार काही चांगले चालले नव्हते. बाळासाहेबांनी मनात आणले असते तर शरद पवारांशी युती करून ते सत्ता स्थापन करू शकले असते. पण बाळासाहेबांनी तसे कधीही केले नाही. उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या राजकीय कृती बाळासाहेबांच्या नेमक्या विरोधात आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय विरोधकांशीच हात मिळवला.जनतेने कौल दिलेली महायुती मोडून जनतेने नाकारलेल्या पक्षांना सत्तेत आणून बसवले. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी जनमताचा असा अनादर कधीही केला नसता.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचार फेरीत बॉम्बस्फोटातील आरोपी
बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. 1990 नंतर सामना या दैनिकाचे अग्रलेख काढून बघितले तर बाळासाहेबांच्या आक्रमक भूमिकेची कल्पना येईल. "बाबरी मशीद पाडणारे जर शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे", " हिंदूंनो, तिसरा डोळा उघडा" असे आक्रमक अग्रलेख सामन्यातून त्या काळात प्रसिद्ध झाले होते. 1993 साली मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्यातील एक स्फोट शिवसेना भवनाच्या बाहेर झाला होता. भारताशी दगाबाजी करणाऱ्या प्रत्येकाची बाळासाहेबांना चिड होती. पण सत्तेसाठी अशा व्यक्तींशी बाळासाहेबांनी कधीही सौदेबाजी केली नाही.विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या प्रचार फेरीत चक्क बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाले होते,यावरून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेची कशी थट्टा मांडली हे स्पष्ट होते.
मुंबईच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार्याच्या विरोधात प्रचार
1993 चा मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला प्रचंड गाजला. जीवावर उदार होऊन उज्वल निकम यांनी म्हणून हा खटला विशेष सरकारी वकील म्हणून लढवला.या खटल्यातील अनेक आरोपींना शिक्षा झाली.कसाब विरोधातील खटलाही निकम यांनीच लढवला.बाळासाहेबांच्या हाती असते तर त्यांनी उज्वल निकम यांना लोकसभेवर किंवा राज्यसभेवर पाठवले असते. मुंबईच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याचे बक्षीस त्यांनी निकम यांना नक्की दिले असते. पण उद्धव ठाकरे यांनी निकम यांच्या विरोधात प्रचार केला. निकम यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे वाटेकरी उद्धव ठाकरे झाले. वेळोवेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येक मुंबईकराचा हा घोर अपमान होता,जो बाळासाहेबांनी कधीही सहन केला नसता.
"खांद्यावर भगवा झेंडा आणि देशविरोधी विचारधारेचा पुरस्कार"
कलम 370 रद्द करणे, राम मंदिराची उभारणी, समान नागरी कायदा यांचा खंबीर पुरस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी केला. शिवसेना आणि भाजपा यांची युती हिंदुत्वावर आधारित या तीन मुद्द्यांवरच झाली होती. पण उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही मुद्द्यांच्या विरोधकांशीच आघाडी केली. "खांद्यावर भगवा झेंडा आणि देशविरोधी विचारधारेचा पुरस्कार" हेच उद्धव यांचे गेल्या पाच वर्षातले राजकारण राहिलेले आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांना कधीही आवडले नसते. बाळासाहेबांची स्वप्ने साकार करणाऱ्या पक्षाला आणि नेतृत्वालाच आज उद्धव ठाकरे दूषण देत आहेत आणि बाळासाहेबांच्या स्वप्नांची खिल्ली उडवणाऱ्या पक्षांना खांद्यावर घेत आहेत हे बाळासाहेबांचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया जुन्या जाणत्या शिवसैनिकातून व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरेंची कॉंग्रेस झाली
"माझ्या संघटनेची काँग्रेस होऊ देणार नाही,ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करून टाकीन, असे बाळासाहेब ठाकरे जाहीर मुलाखतीत म्हणाले होते. आज काँग्रेसचा विचार हाच उद्धव ठाकरे यांचा विचार झाला आहे. काँग्रेसचे नेते हेच उद्धव ठाकरे यांची नेते झाले आहेत. काँग्रेसचे धोरण हेच उद्धव ठाकरे यांचे धोरण झाले आहे. काँग्रेसची भूमिका हीच उद्धव ठाकरे यांची भूमिका झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत बाळासाहेब यांच्या भूमिकेचा साधा अंश ही शिल्लक राहिलेला नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट पूर्णपणे काँग्रेसमय झाला आहे. आणि म्हणूनच दुकान बंद करण्याची बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जनतेनेच कंबर कसली आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications