Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तुकडेबंदी कायदा शिथिल करणार म्हणजे नेमके काय होणार? समजून घ्या जमीन खरेदी ते रजिस्ट्रीपर्यंतचा फायदा

Tukdebandi law will be relaxed : राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ९ जुलै २०२५ रोजी तुकडे बंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे जमीनीचे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा कायदा शिथिल केला जात आहे. खास बाब म्हणजे भविष्यात कायमस्वरुपी हा कायदा रद्द करण्यासाठी एसओपी ठरविली जाईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

या कायद्यामुळे आता राज्यातील रखडलेले जमीन व्यवहार आणि झालेले जमीन व्यवहार कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. हा कायदा भविष्यात रद्द होऊ शकतो असेही महसूल मंत्र्‍यांनी म्हटले, त्यामुळे आगामी काळात सरकार हा कायदाच रद्द करण्याचा मोठा निर्णय घेईल हे स्पष्ट जाणवत आहे. तुकडेबंदी कायदा शिथिल करणार म्हणजे सरकार नेमके काय करणार, फायदा कसा होणार हे आपण जाणून घेऊया.

Tukdebandi law will be relaxed


तुकडेबंदी कायदा शिथील करणार म्हणजे नेमके काय होणार? (Tukdebandi law will be relaxed)

तुकडेबंदी कायदा शिथिल करताना, एक योग्य कार्यपद्धती तयार करून १५ दिवसांत ती जाहीर केली जाईल.
ही कार्यपद्धती म्हणजेच एसओपी प्लॉटिंग, लेआऊट, रस्ते, रजिस्ट्री, रिअलिस्टिक बांधकामे यासंबंधी नियम स्पष्ट करेल.
ही प्रक्रिया दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल.
एसओपी तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित करण्यात येईल.
यामध्ये एसीएस महसूल, एसीएस युडी, जमाबंदी आयुक्त आणि आयजीआर यांचा समावेश असेल.
ही समिती प्रत्येक भागातील परिस्थितीचा अभ्यास करून शिफारसी करेल.

Take a Poll

तुकडे बंदी कायदा शिथील करण्याचे फायदे काय असतील? (Tukdebandi kayada)

1. एक, दोन, तीन गुंठे जमीनीची खरेदी विक्री करता येऊ शकेल

शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्याकडे एक दोन आणि तीन गुंठे शेतजमीन आहे त्यांना या तुकड्यांची खरेदी विक्री करता येऊ शकेल. आधी एक, दोन आणि तीन गुंठे जमीन विक्री करता येत नव्हती नव्या कायद्याने खरेदी विक्री सोपी होऊ शकते.

2. शेतात घर बांधणे सोपे होऊ शकते

शेतकऱ्यांना जमीनीचा वापर करता येऊ शकते. त्या जागेवर घर बांधता येणार, विहीरीसाठी जागा किंवा पुरक व्यवसाय करता येऊ शकेल. जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात घर बांधायचे असेल तर त्याला तुकडेबंदी कायद्यानुसार, घर बांधण्यास समस्या येत होत्या पण आता तुकडेबंदी कायद्यातील सुधारणांमुळे शेतात घर बांधणे कायदेशीरदृष्ट्या सोपे होऊ शकते.

3. व्यवहार नियमित होतील, सातबाऱ्यावर नाव

तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करुन यापुर्वी अनेक एक, दोन आणि तीन गुंठे जमीन बेकायदेशीररित्या खरेदी विक्री केली गेल्याचे दिसून आलेले आहेत. नव्या सुधारणेमुळे एक - दोन गुंठे जमीनीची विक्री नियमित होऊ शकते. त्यामुळे तुकड्यांचेही फेरफार शेतकऱ्यांना मिळेल आणि सातबाऱ्याच्या उताऱ्यावरही गुंठ्यात जमीन असलेल्यांची मालकांची नोंद होऊ शकते.

काय आहे महाराष्ट्रातील तुकडेबंदी कायदा?

महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. यामुळे जमीनीचे तुकडे पाडण्यास निर्बंध आहेत. याबाबत सविस्तर समजून घ्यायचे झाले तर महाराष्ट्र सरकारच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, शेतजमीनीचे एक, दोन आणि तीन गुंठे जमीन विक्री किंवा खरेदीस निर्बंध आहेत. दरम्यान, राज्य सरकारने ५ मे २०२२ रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले त्यानुसार,राज्यातील सर्व जिरायत जमिनीसाठी २० आणि बागायती जमीनीसाठी १० गुंठे तुकड्याचे प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+