Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातील या आहेत टॉप घोषणा; जाणून घ्या सविस्तर
मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे. आज राज्याच्या अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडला. अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणांचा समावेश आहे. विरोधकांकडून हा तर निडणुकीचा अर्थसंकल्प आहे, असं म्हटलं जातं आहे. या अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा पाहुयात.

शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस
लोकसभा निवडणुकीत कांदा, सोयाबीन उत्पादकांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे कांदा पिकासाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच गाईच्या दुधाला प्रतीलिटर 5 रुपये अनुदान सरकार देणारं आहे. मागेल त्या शेतकऱ्याला सोलर कृषीपंप मिळेल. तसेच प्रत्येक गावात शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम बनवले जाणार आहे. येत्या जुलैपासून या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल.
पीकविमा
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे.
महिला, मुलींना दिलासा देण्याचा प्रयत्न
महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, सर्वांगीण विकासासाठी या योजने अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. तर काही पात्र महिलांना वर्षातून 5 सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
🔰28-06-2024 🛣️ विधान भवन, मुंबई
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 28, 2024
⏱️ राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प #पावसाळीअधिवेशन२०२४#MonsoonSession2024#Budget2024#Maharashtra https://t.co/YNBcgCBqJR
वारीच्या प्रतिदिंडीला 20 हजार रुपयांचा निधी
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना, प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
शासकीय महाविद्यालये स्थापन होणार
राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर्स आहेत. 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्येमागे 100 हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार, जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेतून पात्र कुटुंबाना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पेट्रोल - डिझेलच्या दरात कपात
अर्थसंकल्पात इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे. पेट्रोल 65 पैसे तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होईल.
एकंदरीतच राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आला. आता सरकार अंमलबजावणी किती क्षमतेने करते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर हा निवडणूक केंद्रित अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधक करत आहेत.
जवानांसाठी मोठी मदत
उपमुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सुट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे १२ हजार जवानांना होईल.












Click it and Unblock the Notifications