सौंदाण्याच्या सरपंचाचा घातपात की अपघात..? आता मोठी बातमी आली समोर; गावकरी म्हणतात...
बीड जिल्ह्यात मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे प्रकरण गाजत आहे. असे असतानाच आज बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला. परळी तालुक्यातील सौदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाल्या. हा अपघात होता की घातपात..? अशा चर्चांना जोर आला. मात्र आता या प्रकरणात सौदाण्याच्या ग्रामस्थांनीच पुढाकार घेत, नवी माहिती दिली आहे.

कसा झाला अपघात?
परळी तालुक्यातील सौंदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली . शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मिरवड फाट्याजवळ हा अपघात झाला. क्षीरसागर हे शेतातून घराकडे परत येत असताना हा अपघात झाला. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की, क्षीरसागर यांच्या गाडीचा पार चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर डंपरचालक वाहन जागेवर सोडून पळून गेला होता.
घातपाताची चर्चा
सध्या बीड जिल्हा व परळी तालुका हा मस्सोजोगच्या सरपंचाच्या हत्येमुळे महाराष्ट्रात चर्चेत आला आहे. त्यातच आता सौदाण्याच्या विद्यमान सरपंचाचाही मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली. हा अपघात असला तरी या प्रकरणात काही घातपात आहे का, अशा चर्चांना हवा मिळाली. हे प्रकरण पुन्हा थेट महाराष्ट्रभर पोहोचले. परळी पोलिस ठाण्यात तत्काळ अपघाताची नोंद करुन डिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
काय म्हणतात ग्रामस्थ?
आता या प्रकरणात सौदाण्याचे ग्रामस्थ समोर आले आहेत. सौदाणे येथे भरधाव वेगाने राखेची वाहतूक करणारे डिप्पर चालू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यांचा कुणीही दुश्मन नाही. त्यामुळे हा घातपात असण्याचा विषयच नाही, असेही ग्रामस्थ बोलू लागले आहे. हा अपघातच होता, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तातडीने डिप्पर चालकाला अटक करुन त्याला योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.












Click it and Unblock the Notifications