ठाकरे गटाचा मोठा निर्णय..! आदित्य ठाकरे यांच्यावर दिली 'ही' मोठी जबाबदारी

Thackeray group's decision- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीने २३० जागांवर विजय मिळाला, तर मविआ केवळ ४६ जागांवर जिंकू शकली. या मोठ्या पराभवानंतर नुकतीच ठाकरे गटाने आपल्या आमदारांची व नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले.

Aditya Thackeray

ठाकरे गटाने घेतली तातडीची बैठक

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआचा मोठा पराभव झाला. निवडणुकीपूर्वी महायुती व महाविकास आघाडीत काटे की टक्कर होईल, असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीने एकहाती निवडणूक जिंकली. या निवडणुकीत ठाकरे गटाला फक्त 20 जागा मिळाल्या. या मोठ्या पराभवानंतर महाविकास आघाडीत सर्वच पक्षांनी आपल्या नेत्यांची व आमदारांची बैठक घेतली. तशीच बैठक ठाकरे गटानेही घेतली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थितीत होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली. यात आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली.

आदित्य ठाकरेंवर दिली मोठी जबाबदारी

शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+