वाघोली-खराडीत 'सुरेंद्र पठारे आणि टीम'चा झंझावात; विकासाच्या 'ब्लूप्रिंट'समोर विरोधक निरुत्तर?
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Pune Municipal Election) रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदानाला अवघे ८ दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रभागात सुरेंद्र बापूसाहेब पठारे, तृप्ती भरणे, रत्नमाला सातव आणि शैलजित बनसोडे या चौघांच्या 'पॅनेल'ने प्रचारात मोठी मुसद्दी मारली असून, त्यांच्या एकत्रित शक्तीने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे.

पॅनेलची 'चौफेर' ताकद: अनुभवाचा आणि उत्साहाचा संगम
राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रभाग ४ मधील हे पॅनेल अत्यंत संतुलित मानले जात आहे. सुरेंद्र पठारे यांचा 'युथ आयकॉन' म्हणून असलेला प्रभाव, दांडगा जनसंपर्क, यांची संघटनात्मक बांधणी यामुळे या पॅनेलची ताकद वाढली आहे. सुरेंद्र पठारे, तृप्ती भरणे, रत्नमाला सातव, शैलजित बनसोडे हे चौघेही एकाच ध्येयाने मैदानात उतरल्याने त्यांच्यात असलेला समन्वय मतदारांना आकर्षित करत आहे.
'टीम देवेंद्र'चा विश्वास
सुरेंद्र पठारे यांनी आपल्या सुशिक्षित आणि सर्वसमावेशक प्रतिमेच्या जोरावर सर्व स्तरांतील मतदारांमध्ये स्थान निर्माण केले आहे. पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे. 'टीम देवेंद्र'चा महत्त्वाचा हिस्सा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने, पुण्याच्या भविष्यातील नेतृत्वाचा चेहरा म्हणून तरुण वर्ग त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आहे.
वाहतूक कोंडीवर 'मास्टरप्लॅन': दुमजली पुलाचा मुद्दा ठरतोय प्रभावी
प्रभाग ४ मधील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाघोली आणि खराडी बायपास परिसरातील वाहतूक कोंडी. यावर भाजपने दिलेले 'दुमजली पुलाचे' आश्वासन मतदारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. "केवळ आश्वासन नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची क्षमता पठारे आणि त्यांच्या पॅनेलमध्ये आहे," असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
विरोधी गटात चिंतेचे सावट?
एकीकडे पठारे यांच्या पॅनेलची 'तरुणांची फौज' घराघरांत पोहोचत असताना, दुसरीकडे विरोधकांकडे या तोडीचा चेहरा किंवा ठोस अजेंडा नसल्याचे चित्र ग्राऊंडवर आहे. तुल्यबळ विरोधकांचा अभाव हा या निवडणुकीतील एक महत्त्वाचा फॅक्टर ठरत आहे. भाजपच्या लोकप्रिय योजना आणि पठारेंचा वैयक्तिक करिष्मा यामुळे प्रचाराच्या पहिल्या फेरीपासूनच या पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे.
तज्ञांचे काय म्हणणे आहे?
प्रशासकीय आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक सांगतात की, "प्रभाग ४ मध्ये यंदा मतदारांचा कल हा 'स्थैर्य' आणि 'विकासाची हमी' याकडे आहे. जेव्हा चारही उमेदवार एकाच विचाराचे आणि ताकदीचे असतात, तेव्हा विकासकामांना गती मिळते, हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात हे पॅनेल यशस्वी झाले आहे."
नक्की कोणत्या मुद्द्यांवर पठारे पॅनेल वरचढ ठरतेय?
- एकीचे बळ: चारही उमेदवारांचा एकमेकांना असलेला पाठिंबा आणि एकत्रित प्रचार.
- ग्राऊंड कनेक्ट: कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा नेता अशी सुरेंद्र पठारेंची ओळख.
- दुमजली पूल: वाहतूक कोंडीतून सुटकेचा ठोस आराखडा.
- युथ फॅक्टर: तरुणांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग आणि सोशल मीडियावरील सक्रियता.
एकूणच चित्र पाहता, प्रभाग ४ मध्ये सुरेंद्र बापूसाहेब पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे असे चित्र सध्या दिसते आहे.












Click it and Unblock the Notifications