Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सरकार लोकांना फसवतयं असं होऊ नये.. वाघनखं खरी की खोटी? हे सांगा, या बड्या नेत्याची मागणी

मुंबई - सरकारने वाघनखं आणली त्याचे कौतूक आहे, पण ही वाघनखं खरी आहे की, खोटी हे सरकारने आज होणाऱ्या प्रदर्शन सोहळ्यातच स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्या माध्यमांशी आज संवाद साधत होत्या.

वाघनखांबद्दल व्यक्त केली शंका

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांची वाघनखं लंडनच्या संग्रहालयात असून ती आपण आणण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले होते. त्यानंतर सरकारने प्रयत्न करुन वाघनखं भारतात आणली. ही मोठी आणि कौतूकाची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पण यासोबतच त्यांनी वाघनखांबद्दल शंकाही उपस्थित केली आहे.

Supriya Sule on Shivaji Maharaj Vaghankhe

आज प्रदर्शन सोहळा

शिवरायांची वाघनखे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी या संग्रहालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन आज (ता. १९ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होत आहे. त्या धर्तीवर सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकतर त्या वाघ नखांबद्दल प्रयत्न केला त्यामुळे सरकारचे कौतूक आहे. आनंदही आहे, इंद्रजित सावंत असे सारखे म्हणतात की, त्यांना संग्रहालयातून एक पत्र आले आहे की, जेथून ही वाघनखं आली त्याच म्युझियममधून ही वाघनखं नक्की खरी आहे की, नाही हे माहिती नाही असे न्यूज वाहिन्यांवर मी पाहिलेले आहे.त्यामुळे नक्की ही वाघनखं कुठून आली त्याचे मुळ काय हे काही समजत नाही.

सरकार लोकांना फसवतं असं झालं तर...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे की, ती खरी आहेत की नाही हे सांगावे. कारण खूप अपेक्षने लोक तिथे जात आहत. लहान मुलांनाही ते दाखवण्यासाठी वेगळा वेळ देणार आहेत. पण नंतर जर सरकारच लोकांना फसवतं असं झालं तर मुलांवर काय संस्कार होतील. त्यामुळे वाघनखांबद्दल स्पष्टीकरण द्यावे. इतिहास स्वतःच्या मनापासून लिहिता येत नाही त्यामुळे इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा आणि सांगायचा असतो.

वाघनखांद्वारे अफजलखानाचा वध

छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखाद्वारे 1659 मध्ये प्रतागडावर अफजलखानाचा वध केला होता. मात्र ती वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरीया अल्बर्ट संग्रहालयात होती. ती तेथून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार यांनी या संग्रहालयातून आणण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दोन दिवस आधीच दाखल झाली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+