Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SSC Board Exam 2025 : दहावीचा पेपर फुटलाच नाही..! काय म्हणाले जिल्हाधिकारी? वाचा सत्य

SSC Board Exam 2025 : राज्यात दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला' ही बातमी समोर आली होती. आता या विषयावर जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तथ्य सांगितले असून दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय होते वृत्त?

दहावीचा आज मराठीचा पेपर होता. या पहिल्याच पेपरच्या दिवशी परीक्षा सुरु झाल्यानंतर पेपर फुटण्याचा प्रकार उघडकीस आला. पेपर सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्राजवळ असलेल्या एका झेराँक्स दुकानात मराठीचा पेपर आला असे सांगण्यात आले होते. त्यानंतर या पेपरच्या प्रिंट काढण्याचे काम सुरु होते. या प्रिंट परिक्षार्थींच्या नातेवाईक व मित्रांना देऊन त्यानंतर काॅफीचे प्रकार सुरु झाले अशी माहिती पुढे आली होती.

SSC Board Exam 2025

काय म्हणाले जालना येथील जिल्हाधिकारी?

जालना येथील जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले की, 'जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटला' या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही.

'दोषीवर गुन्हा दाखल होतोय' - जिल्हाधिकारी

प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

दहावी बोर्ड परीक्षा कधीपासून कधीपर्यंत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झाली आहे. या परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपणार आहेत. या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची योजना जाहीर केली आहे. सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या परीक्षा दरवर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात.
सीबीएसई बोर्डाने जेईई आयोजित करते. हे आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी एक स्पर्धात्मक परीक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+