राज्यात सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण
मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या तोंडला सरकारकडून तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असं राज्याच्या पणन विभागाने स्पष्ट केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर शेतक-यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला 90 दिवसाचा कालावधी 13 जानेवारी 2025 रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण 24 दिवसांची मुदतवाढ दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिली होती.ही मुदतवाढ संपल्यानंतर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकर्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केलेली नाही.

काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात 24 दिवस व तेलंगणामध्ये 15 दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याच्या बातम्या समोर येत होत्या.मात्र ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने दिनांक 6 फेब्रुवारी 2025 नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र उभरण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतक-यांची ही परिस्थिती असल्यामुळे केंद्र सरकारने विचार करून हा निर्णय घ्यावा, अशी शेतकरी भूमिका मांडत आहेत.












Click it and Unblock the Notifications