मला जेलमध्ये टाकण्यासाठी एसआयटी नेमली, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
नांदेड: मी मराठा आरक्षणासाठी लढत आहे, माझे शरीर मला साथ देत नाही. माझ्या शरीराची चाळणी झाली, तरीही सरकारने माझ्याविरोधात हल्ले आणि षडयंत्र सुरुच ठेवले आहे. मला जेलमध्ये टाकण्यासाठी सरकारने एसआयटी नेमली, असा आरोप मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा परवापासून सुरु झाला. आज नांदेड शहरात त्यांच्या उपस्थितीत मोठी रॅली निघाली. यानंतर आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते.

मराठ्यांवर डाव टाकण्याचा प्रयत्न
जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांच्या लेकरांना न्याय द्यायचा असेल, लेकरांचे वाटुळे होऊ द्यायचे नसेल तर आता मुलं-बाळंही आंदोलनात सामिल झाली आहे. सरकारचा मराठ्यावर डाव टाकण्याचे ठरवले. सरकारने छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आरक्षण पुन्हा सरकार त्यांच्या आडोशाला लपत आहे.
सरकारने त्यांना मंत्रिपद दिले. आपल्या मंत्रिपदाच्या जोरावर ओबीसीचे पडेल आमदार गोळा करायला सुरुवात केली. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी हे त्यांना सांगितले असावे. सरकारमध्ये छगन भुजबळ यांना एवढी मस्ती कशाची आली असा सवालही त्यांनी केला.
मराठ्यांनी ठरवले असते तर...
जरांगे पाटील म्हणाले, मराठ्याचे आंदोलन शांततेत सुरु आहे. अंतरवालीत मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे त्यासमोरच त्यांनी आंदोलन आणून बसवले. याचा अर्थ छगन भुजबळांना सरकारचा पाठींबा आहे.
मराठ्यांसोबत त्यांना दंगल घडवून आणायची. मराठ्यांना आवाहन केल्यानंतर मराठा शांत बसला. जर मराठ्यांनी ठरवले असते छगन भुजबळला जोरदार उत्तर दिले असते पण मराठ्यांवर असे संस्कार नाही. मराठा शांत बसला तर शांतच राहतो.
मी मराठा समाजाला माय-बाप मानतो
जरांगे पाटील म्हणाले, मी मराठा समाजाला मायबाप मानले. मी तुमच्याशी दगा कधीच करणार नाही फक्त शांततेत राहा. त्यांनी कितीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही शांत राहा. शांततेचे युद्ध कुणालाच पेलणार नाही. खेड्यातील ओबीसी- मराठा गुण्यागोविंदाने नांदायला हवे. मराठा समाजाचा कधीही दगाफटका मी करणार नाही.
मी याची शपथ घेतो. मला शरीर साथ देत नाही तरीही सरकारने माझ्याविरोधात हल्ले सुरु केले. षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकण्यासाठी एसआयटी नेमली.
ओबीसीतून आरक्षण घेणारच
जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांच्या मुलांना अधिकारी होताना पाहायचे आहे. मराठ्यांचे मायबाप रात्रंदिवस कष्ट करतात. कष्टाने ते लेकरे शिकवत आहेत. मराठे ऊसही तोडून, व्याजाने पैसे काढून शिक्षण शिकत आहेत. सावकाराच्या घशात पैसे गेले पण लेकरांना शिकवण्यात कमी केली नाही. पण या आरक्षण न मिळाल्याने मराठ्यांचा घात झाला आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही.












Click it and Unblock the Notifications