फडणवीसांनी तुळशी वृंदावनात भांगेची झाडं लावतील... संजय राऊतांनी धो-धो धूतलं
मुंंबई : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात सदाभाऊ खोतांसारखी कोणत्या लायकीची माणसं उभी केलीत, ते पहावं. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. मात्र फडणवीसांनी तुळशी वृंदावनात भांगेची रोपटी लावलीत, अशी थेट टिका संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत केलेल्या टिकेवरुन आज संजय राऊत यांनी फडणवीस व खोतांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात सध्या विष पेरण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत..?
नकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. खोत म्हणाले होते की, शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला. पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का..? सदाभाऊ खोत यांच्या या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून सध्या जोरदार पलटवार केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली आहे.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत म्हणाले की, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन शहरात पवार हे आपले कसे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे, हे वारंवार सांगितलंय. भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असे हे म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहावा. आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं, याचं देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं, असा हल्लबोल त्यांनी केला.
कानफडात मारायला हवी होती
राऊत पुढे म्हणाले की, पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर असं व्यक्त करून महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. तुळशीच्या वृंदावनात भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहेत.
महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications