Shivraj Patil : शिवराज पाटील चाकूरकरांनी का दिला होता गृहमंत्रीपदाचा राजीनामा? 'हे' होते मोठे कारण
Shivraj patil home minister suit controversy 26/11 Mumbai Terror Attack : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज १२ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लातूर येथे त्यांचे निधन झाले, देश एका मोठ्या नेत्याला मुकला असून इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली होती. त्यांची पंतप्रधान होण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली होती असे सांगितले जाते.

देशपातळीवर आणि महाराष्ट्रातल राजकारणातही शिवराज पाटील चाकूरकर यांनी मोठी भूमिका बजावली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्रीपदावर असताना त्यांच्या नावावर एक असा वादाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्यांना केवळ आपली खुर्चीच गमवावी लागली नाही, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो एक प्रकारे शेवट ठरला. हा वाद २००८ च्या मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे.
२६/११ हल्ल्यादरम्यानचा वाद
देशातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी, शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद आणि रुग्णालयात जखमींना भेटण्यासाठी जाताना वारंवार कपडे (सूट) बदलले. गंभीर परिस्थितीत त्यांनी कपड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने ते प्रसारमाध्यमे आणि विरोधी पक्षांच्या टीकेचे लक्ष्य ठरले. इतकेच नाही, तर रुग्णालयात पीडितांना भेटायला जाताना ते आपले बूट खराब होऊ नये म्हणून जपताना एका व्हिडिओमध्ये दिसले होते. या कृतीमुळे माध्यमांकडून त्यांच्यावर टीका झाली होती. तीव्र नाराजी उत्पन्न झाल्यानंतर त्यांना 'सूट बदलणारे गृहमंत्री' अशी टीका त्यांच्यावर झाली होती.
दहशतवादी हल्ल्यानंतर राजीनामा दिला
२००५ ते २००८ या काळात हैदराबाद, वाराणसी, मालेगाव, जयपूर, अहमदाबाद, बेंगळूरू आणि दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यानंतर २६/११ च्या हल्ल्याने सुरक्षेतील मोठी चूक उघड झाली, या सर्व विवादानंतर आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील यांना मोठ्या मनाने ३० नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग हळूहळू संपुष्टात आला. शिवराज पाटील चाकूरकर यांना नंतर राज्यपालपद देण्यात आले होते.
हेही वाचा : कोण होते शिवराज पाटील चाकूरकर? लातूरमधूनर राजकीय कारकीर्द ते देशाचे गृहमंत्री, वाचा कारकिर्द, जीवन
नेहरू-गांधी कुटुंबाशी जवळीक
लातूरमधून ७ वेळा खासदार राहिलेले शिवराज पाटील हे महाराष्ट्र काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते. २००४ मध्ये यूपीए सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना गृहमंत्रीपदाची संवेदनशील जबाबदारी मिळाली.
हेही वाचा : Shivraj patil chakurkar death : काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन












Click it and Unblock the Notifications