Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shivraj patil chakurkar death : काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज , १२ डिसेंबर २०२५ रोजी लातूर येथे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात एनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. चाकूरकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या प्रशासकीय कारभारात त्यांनी मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. चाकूरकर यांच्या निधनाचे वृत्त धडकताच निवासस्थानी राजकीय नेते आणि नागरिकांनी गर्दी केली आहे.

Shivraj patil chakurkar death

राजकीय कारकीर्द आणि महत्त्वाचे टप्पे

शिवराज पाटील चाकूरकर हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे सुपुत्र होते. ते दिग्गज काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात होते. चाकूरकर यांनी राजकीय अनेक पदे भुषवली होती.

विधानसभा ते लोकसभा

  • १९७३ साली ते प्रथम लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले. त्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली.
  • १९८० साली त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघामधून प्रथम लोकसभेवर विजय मिळवला आणि त्यानंतर सलग ६ निवडणुकांमध्ये येथून त्यांनी विजय मिळवून खासदारकी भूषवली.
  • लोकसभेचे ते १०वे सभापती होते, हे पद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द

२००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर, २००४ ते २००८ या काळात त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

दहशतवादी हल्ल्यानंतर राजीनामा

  • २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याच्या तीव्र टीकेमुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
  • निवृत्तीनंतर, २०१० ते २०१५ दरम्यान त्यांनी पंजाब राज्याचे राज्यपाल तसेच चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक म्हणूनही काम पाहिले.
  • शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+