नवाब मलिक विरुद्ध अबू आझमी; शिवाजीनगरमध्ये मतविभागणीचा सुरेश पाटलांना होणार फायदा

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चा आली आहे. चार वेळा आमदार असलेल्या समाजवादी पार्टीच्या अबु आझमी यांच्याविरोधात यंदा महायुतीने चांगली तयारी केली आहे.महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुरेश पाटील हे आझमी यांच्याविरोधात लढणार आहेत.

सुरेश पाटील व अबू आझमी हे यापूर्वी 2014 मध्येही एकमेकांविरोधात लढले होते. मात्र त्यावेळी 50 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतांच्या जोरावर अबू आझमी यांनी केवळ 10 हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र आता परिस्थिती एकदम वेगळी आहे. यावेळी या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे तीन दिग्गज उमेदवार उभे आहेत. त्यामुळे सहाजिकच शिवसेना शिंदे गटाच्या सुरेश पाटील यांच्या विजयाच्या संधी वाढल्या आहेत.

Suresh Patil

शिवाजीनगरमध्ये कशी होणार लढत

या मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी यांनी समाजवादी पक्षाकडून फाँर्म भरला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अबू आझमी हेही लढत आहेत. याशिवाय एमआयएम पक्षाचे अतीक अहमद खान हेही निवडणुकीच्या रिंगणात आहे. या तिन्ही दिग्गज मुस्लिम उमेदवारांविरोधात महायुतीने शिवसेना शिंदे गटाच्या सुरेश पाटील यांना रिंगणात उरतवले आहे. मुस्लिम मतदारांमध्ये फूट पडून येथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

अबू आझमींविरोधात प्रचंड नाराजी

वाढलेली गुन्हेगारी, अमली पदार्थाचे मतदारसंघात जाळे, बायोमेडिकल कचऱ्याच्या प्रकल्पातून होणारे प्रदूषण, शिक्षणाच्या अपूऱ्या सुविधा, वैद्यकिय सुविधांचा उडालेला बोजवारा हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातील महत्तावाचे प्रश्न विद्यमान आ. अबू आझमी सोडवू शकलेले नाही. चार वेळा आमदार असूनही त्यांना या मतदारसंघात काहीच करता आले नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. नशेचा व्यापार या मतदारसंघात वाढल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आझमी यांच्याविषयी नाराजी वाढल्यानंतरच मुस्लिम मतदारांनी येथून नवाब मलिकांचे नाव समोर आणले. याशिवाय एमआयएमनेही विद्यमान आमदारांविरोधात मोर्चेबांधणी करत, अतीक अहमद खान यांना पाठबळ दिले.

महायुतीची विकासकामे

एकीकडे समाजवादी पार्टीच्या विद्यमान आमदाराविरोधात नाराजी असताना महायुतीने गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात जास्त लक्ष देत विकासकामे केली. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या विकासकामांमुळेही मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित केल्याचे चित्र आहे. लाडकी बहिण योजनेसह महिलांसाठीच्या इतर योजना या मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या गेल्याने मुस्लिम महिला मतदारांमध्येही महायुतीबाबत चांगले वातावरण तयार झाल्याचे बोलले जात आहे. तीन मुस्लिम उमेदवारांमुळे होणारा मतांची विभागणी, महायुतीची विकासकामे व सुरेश पाटील हा चर्चेतला चेहरा या त्रिसुत्रीमुळे शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण या मतदारसंघात विजयी होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+