महायुतीत वादाची ठिणगी, फडणवीस यांनी आव्हान केल्यानंतर ही मिटकरी यांच्याकडून भावनिक टिट्ट
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळला दुर्दैवाने कोसळण्याने राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. मालवणमध्ये आज महाविकासआघाडीकडून सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार आहे.
विरोधकांनी या घटनेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवरून जे राजकारण सुरू झाले आहे, ते फारच दुर्दैवी आहे. पुतळा कोसळल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. परंतु जो छत्रपतींचा खरा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही, असे आव्हान केले होते.

अमोल मिटकरी यांच्याकडून भावनिक ट्टिट
देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी पुतळा कोसळल्याचे फोटो ट्वीट करून महायुती सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. मिटकरींनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, "महाराज माफ करा, कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी " अशी पोस्ट मिटकरी यांनी केल्यामुळे आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महाराज माफ करा 🙏🏼 कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी 😔 pic.twitter.com/5gEiihuzvc
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2024
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मालवण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्याच्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्या आहेत. यावर कोणीही राजकारण करु नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं, त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे." अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती.
मुख्यंमत्र्यांनी शिंदेकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या 35 फुटी पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले होते की, विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केले होते. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे हे नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications