शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर मंगळवारी सुनावणी, निर्णय आला तर कुणाला बसणार फटका ?
MLA Disqualification Case Update : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांनी शिंदे गटाच्या तर शरद पवार गटाने अजितदादा गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर त्यावर युक्तिवादही झाला. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच तसेच न्यायमूर्ती चंद्रचूड निवृत्त होण्याआधी ऐतिहासिक निकाल देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'पुन्हा तारीख पे तारीख' ची शक्यता
सुप्रीम कोर्टात 313 क्रमांकावर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, हे प्रकरण 313 त्या दिवशी आयकर विभागाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर पुढची तारीख मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

न्या. चंद्रचूड ऐतिहासिक निर्णय देणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर तारखांवर तारखा लांबणीवर पडत होत्या. यापूर्वी 18 सप्टेंबरला सुनावणी होणार होती, यानंतर सुनावणीची तारीख 22 ऑक्टोबर देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने तसेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण नमूद केले यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीक मंगळवार 24 सप्टेंबरची रोजीची मिळाली आहे. पण मंगळवारी दुसरी एक मोठी सुनावणी असल्याने या प्रकरणाची सुनावणी अधांतरी लटकण्याची शक्यता आहे. पण सुनावणी झालीच तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे ऐतिहासिक निर्णय देणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षात फुटी पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांसोबत गेलेल्या आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केले नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तारखांवर तारखा मिळत असल्याने उद्धव ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देऊन चिन्हाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवावे असे लेखी पत्र दिले होते. यामुळे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली होती. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवार आणि शिंदे गटाला बसू शकतो फटका
काही जाणकारांच्या मते आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी झाली व या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला व शिंदे गटाला जागा वाटपाबाबत याचा फटका बसू शकतो. या निर्णयामुळे अजित पवार गट व शिंदे गटाला भाजप किती जागा सोडणार यावर हे देखील पहावे लागेल असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications