Shiv jayanti 2026 5 short speech in marathi : शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास 5 छोटी भाषणं
Shiv jayanti 2026 5 short speech in marathi : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारे ऊर्जेचे स्त्रोत आहेत. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर जन्मलेल्या या महापुरुषाने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. माँ जिजाऊंच्या संस्कारातून बाल शिवाजींचा 'जाणत्या राजा'पर्यंतचा दैदिप्यमान इतिहास आजच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुलांसाठी ५ सोपी आणि छोटी भाषणे (Short Speeches)
१. प्राथमिक गटासाठी (खूप छोटे भाषण):
"अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी माझ्या छोट्याश्या भाषणात आज छत्रपती शिवाज महाराजांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. 'निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा! महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्यांनी 'स्वराज्य' स्थापन केले. त्यांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भवानी, जय शिवाजी!"
२. स्वराज्यावर आधारित भाषण
"नमस्कार मित्रांनो, आज शिवरायांची जयंती, आज आपण स्वराज्य आणि शिवरायांचे किल्ले याबद्दल सांगणार आहे. शिवाजी महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर त्यांनी लोकांची मने जिंकली. अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांनी 'रयतेचे राज्य' निर्माण केले. स्त्रियांचा सन्मान आणि शेतकऱ्यांची काळजी हे त्यांच्या स्वराज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. अशा कल्याणकारी राजाचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायला हवा."
३. आई जिजाऊंचे संस्कार:
नमस्कार मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, यानिमित्त मी तुम्हाला माता जिजाऊंचे शिवरायांवर झालेल्या संस्काराविषयी सांगणार आहे. "आजच्या भाषणात मला प्रामुख्याने राजमाता जिजाऊंचा उल्लेख करावासा वाटतो. शिवबांना घडवण्यात जिजाऊंचा सिंहावतर वाटा होता. त्यांनी रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून शिवरायांच्या मनात शौर्याचे बीज पेरले. म्हणूनच एक शूर राजा या महाराष्ट्राला मिळाला. संस्कारांचे महत्त्व काय असते, हे शिवरायांच्या जीवनावरून समजते."
४. गनिमी कावा आणि युद्धनीती
नमस्कार मित्रांनो आज शिवरायांची जयंती यानिमित्त मी आपणास माझे दोन शब्द सांगणार आहे. "छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान रणनीतीकार होते. बलाढ्य शत्रूला कसे हरवायचे हे त्यांनी 'गनिमी काव्या'तून जगाला दाखवून दिले. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणारे महाराज हे जगातील सर्वोत्तम सेनापतींपैकी एक होते. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आजही परदेशातील लष्करी शाळांमध्ये केला जातो."
५. प्रेरणादायी समारोप
मित्रांनो आजच्या माझ्या समारोपाच्या भाषणात मी तुम्हाला शिवरायांच्या स्वराज्याबद्दल सांगणार आहे. "शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पान नसून ते आपल्या रक्तातील स्वाभिमान आहेत. 'स्वराज्य' टिकवण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले. आज आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशहितासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय!"












Click it and Unblock the Notifications