मारकडवाडीत शरद पवारांचा यल्गार; म्हणाले, निवडणूक पद्धतीत बदल करा, अन्यथा...

Sharad Pawar in Markadwadi- सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी सध्या देशभरात पोहोचली आहे. निवडणूक पद्धतीत बदल करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी केलेल्या अनोख्या अंदोलनाची, सध्या देशभर चर्चा सुरु आहे. याच मारकडवाडीत येत आज शरद पवारांनी या आंदोलनाला पाठींबा देत, संताप व्यक्त केला. शरद पवारांनी स्वतः येत या आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawar

गावकऱ्यांचे केले पवारांनी कौतूक

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या बॅलेट पेपरवर मतदा?न घेण्याच्या कारणावरून चांगलेच चर्चेत आले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला. मात्र मतदानाच्या आकडेवारीबाबत या ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली. हे गाव जानकर यांच्या पाठीशी ठाम असूनही, त्यांना कमी मते कशी मिळाली, हा प्रश्न या ग्रामस्थांना आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी या ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती. मात्र प्रशासनाने ही तयारी हाणून पाडली. त्यानंतर हे गाव राज्यभर व त्यानंतर देशभर चर्चेत आलं. आज स्वतः शरद पवारांनी या गावाला भेट देत ग्रामस्थांचे कौतूक केले.

काय म्हणाले शरद पवार?

भाषणावेळी शरद पवारांनी मारकडवाडी गावाचे कौतुक केले. ते म्हणाले, "निकाल लागल्यानंतर तुमच्या मनात शंका आली. तशीच शंका अनेकांच्या मनात आहे. या महत्त्वाच्या प्रश्नासाठी अनोखा प्रयोग करुन तुम्ही संपूर्ण देशाला जागं केलंय. लोकसभेत धैर्यशील मोहिते आहेत. राज्यसभेत मी आहे. आम्हाला अनेक राज्याचे खासदार भेटतात. ते तुमच्या गावाची चर्चा करतात. हे गाव कुठं आहे, असं ते विचारतात. देश तुमचं अभिनंदन करत आहे", अशा शब्दांत शरद पवारांनी या गावकऱ्यांचे कौतूक केलं. ते पुढे म्हणाले की, आपण ईव्हीएमद्वारे मतदान घेतो. तुम्ही बटन दाबता. मतदान झालं म्हणून तुम्ही समाधानी होता. पण काही निकाल असे आले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली. अनेकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले. त्यात दुरुस्ती केली पाहिजे. ज्या शंका आहेत त्यावर विचार केला पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटले.

निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे- पवार

शरद पवार पुढे म्हणाले, "अमेरिका मोठा देश असूनही तेथे मतपेटीत मत टाकलं जातं. इंग्लंडमध्येही मतपेटीतच मत टाकलं जातं. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला होता मात्र नंतर तो बदलला. आपल्याकडे अनेकदा मतदानाच्या आकडेवारीनंतर लोक अस्वस्थ झाले. जयंत पाटलांनी तुम्हाला आकडेवारी सांगितली. त्यानंतर काहीतरी गडबड आहे, हे आमच्याही लक्षात आलं. आम्ही काही माहिती गोळा केली. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात शंका आहे. ही नाराजी असेल तर काय करता येईल. एकच गोष्ट आहे. आता देशात जी निवडणूक पद्धती स्वीकारली आहे त्यात बदल केला पाहिजे, असं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+