१०० शकूनी मेल्यावर शरद पवार जन्माला आले..! पडळकरांची जहरी टिका नेमकी काय..?
ईव्हीएमच्या विरोधामुळे माळशिरस तालुक्यातीला मारकडवाडीत सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. ईव्हीएम विरोधातील लाँग मार्चसाठी येथे राहुल गांधीही येणार आहेत. त्यापूर्वीच या गावात आज महायुतीने सभा घेतली. या सभेत जत विधानसभेचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेली टिका चांगलीच गाजली. आपल्या भाषणात पडखकरांनी शरद पवारांसह राहुल गांधींवरही हल्ला चढवला.

पडळकरांची पवारांवर जहरी टिका
आपल्या भाषणात आ. पडळकरांनी चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींचे खरे चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत, राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. महाराष्ट्रातही तसेच आहे. देवाभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवारांचे खोटे गावभर फिरून येते. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात १०० गावं आहेत, मात्र शरद पवारांनी याच गावाची निवड का केली, तर येथे धनगर समाज जास्त आहे. धनगर समाज हा लोकशाही मानत नाही, असं शरद पवारांना जगभर पेरायचंय, असा आरोप पडळकरांनी केला.
पडळकरांची राहुल गांधींवरही टिका
गोपिचंद पडळकर यांनी सगळ्याच विरोधकांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, येथे आता राहुल गांधीही येणार आहेत. राहुल गांधींच्या मामाच्या गावालाही ईव्हीएमवरच मतदान होतं. आता ते येथे येऊन ईव्हीएमविरोधात भाषण देणार आहेत. पडळकरांनी जयंत पाटीलांवरही टिका केली. ईव्हीएम विरोधात बोलणाऱ्या विरोधकांनी अगोदर निवडणुका कशा लढायच्यात त्याचा आभ्यास करावा, असा सल्लाही पडळकरांनी दिला.
ग्रामस्थांना केले आवाहन
आपल्या भाषणात पडखळकरांनी ग्रामस्थांना आवाहन केले. ते म्हणाले, आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही चुकीचा पायंडा पाडतायेत. सरंजामशाही मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात. मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजिट जप्त झाले. मग जरा EVM घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? पवारांना मारकडवाडीचे आकर्षण का वाटते तर आता पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर बसणार आहे. पवारांना तुमचं काही देणंघेणं नाही, त्यांचं दुखणं फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, असंही पडखळकरांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications