आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा की, आम्ही हिताचा पर्याय देतो, मग CM चा चेहरा ठरवू - शरद पवार
आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो. निवडणुकीत लोकांची शक्ती, पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील, असे सांगत शरद पवार यांनी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर स्पष्ट सांगितले. ते सोमवारी माध्यमांशी बोलत होते.
अन् त्यानंतर देसाई पंतप्रधान झाले
देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले, पक्ष नंतर स्थापन केला. निवडणुकीला सामोरे गेले, लोकांनी शक्ती दिली , निवडून दिलं. आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली . ज्यावेळी ते लोकांकडे मत मागायला जात होते, त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं, तरीही लोकांनी शक्ती दिली, ते पंतप्रधान झाले, देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

30, 1 तारखेला जागावाटपाचा अंतिम निर्णय
शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षाचे नेते सध्या मतदारसंघनिहाय चर्चा करत आहेत. त्यांनंतर 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या दोन दिवशी कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे याचा निर्णय घेतला जाईल, त्यामुळे सर्व सहमतीने यावर निर्णय होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरेंनी केली होती सीएम चेहऱ्याची मागणी
विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होऊ शकते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून तयारी सुरू केली आहे. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणुकीसाठी जय्यत सुरू केली असली तरी सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा अंदाज कोणालाही लागत नाही. दुसरीकडे मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागण उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्याबाबत काहीच उत्तर न दिल्याने मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यातच आजही शरद पवार यांनी मंत्रिमंडळात कोण असेल, मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर भाष्य करत आहे.












Click it and Unblock the Notifications