विशाळगडाच्या खाली जो मुस्लिम समाज राहत होता, त्यांच्यावर विनाकारण हल्ले! 'या' बड्या नेत्याचे वक्तव्य
पुणे - "विशाळगडाच्या खाली जो मुस्लिम समाज राहत होता, त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांमध्ये कोल्हापूरचे कोण होते, असे दिसत नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतोय असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विशाळगढ प्रकरणावर बोलताना शरद पवार यांनी कोल्हापुरातील व्यक्तींकडून हा हिंसाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. जिथे हिंसाचाराची घटना घडली तिथे मार्गदर्शकतत्वाप्रमाणे शांतता प्रस्थापित होईल, हि अपेक्षाही शरद पवारांनी व्यक्त केली.

सत्ता हाती घेऊन प्रश्न सोडवणार
शरद पवार म्हणाले, आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम आहे.
आमच्या पक्षात येणाऱ्यांचे स्वागत
शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या कडे जे लोक आले त्यांना आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भागातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांना मदत करण्याच्या भावनेने जर कोणी पक्षात येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे.
पिपाणी चिन्ह गोठवली उत्तम निर्णय
शरद पवार म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणूकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला. यापुढं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे, हा अतिशय उत्तम निर्णय झालाय. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवे.
'त्या' वक्तव्यावर मांडले मत
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडे एक वक्तव्य केले. या वक्तव्यावर शरद पवार यांनी मत मांडले, ते म्हणाले की, आता मला कल्पना नाही, ते (मोहन भागवत) कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचे लोक वक्तव्य करायला लागले. शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications