Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांनी उघडलं गुपित,'या' पक्षांना दिली थेट ऑफर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज गृहमंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा दिली. या सुरक्षेवर संदिग्धता व्यक्त करत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे अनेक पत्ते उघडण्यास प्रारंभ केला. आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील तीन पक्षासोबत इतर पक्षांनी व डाव्या पक्षांनीही यावे, असं विधान केलं.

शिवाय मविआचं जागावाटप कधी होईल याबाबतही त्यांनी क्लू दिला. जागावाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांनी लवकरात लवकर घेऊन, लोकांसमोर यावं, अशी अपेक्षा शरद पवारांनी शुक्रवारी माध्यमांसमोर व्यक्त केली.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची बैठक होणार होती. परंतु बदलापूरचा विषय समोर आल्यामुळे ती बैठक स्थगित झाली. आता 27 ऑगस्ट रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक आराखडा तयार होईल, अशी अपेक्षा आहे. शरद पवारांनीही लवकरात लवकर जागावाटप करण्याचे संकेत दिले आहेत.

Sharad Pawar

महाविकास आघाडीत सध्या काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट असे तीन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आगामी विधानसबेपूर्वी डावे पक्ष आणि इतर पक्षांनी मविआत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. सगळ्यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, असे मत शरद पवार मांडले.

काही दिवसांपूर्वी एमआयएमने मविआत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. खा. इम्तियाज जलिल यांनी तशी ऑफर आपण मविआला दिल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी एमआयएम मविआत दिसेल, अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.

बदलापूर घटनेबाबत बोलतान शरद पवार म्हणाले की, बदलापुरातील घटना म्हणजे लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या जनभावना होत्या. त्यामुळे त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावे.

बदलापूर प्रकरण ही धक्का देणारी घटना आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे. हा प्रकार बदलापूरपर्यंतच मर्यादीत नाही. मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा जागरूक करावी लागणार आहे. या प्रकरणी मी कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावे. या घटना वाढत आहेत थांबत नाही. त्यामुळे पोलिस दलाने अधिक संवेदनशील काम केले पाहिजे. परत गुन्हे दाखल करण योग्य नाही.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+