शाळांना 3 दिवस सुट्टी! आनंद द्विगुणित, सलग 6 दिवस शाळा राहू शकते स्कूल बंद! वाचा काय आहे कारण?

Schools to remain closed for 3 days due to voting : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील शाळांना सु्ट्टी देण्यात आली आहे. मतदानाला अवघे पाचच दिवस उरले असून निवडणुकीच्या कामासाठी सर्व शिक्षकांना कर्तव्य बजावण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली.मात्र तीन नाही तर सहा दिवस शाळेला सुट्टी मिळणार आहे. आता आपण म्हणाल हे कसे तर आम्ही तुम्हाला समजून सांगतो.

मतदान प्रक्रियेसाठी शिक्षकांची नेमणूक

राज्यात निर्विघ्न मतदानप्रक्रीया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दक्ष असून जवळपास निवडणुकीची सर्व तयारी आयोगाकडून करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर मतदान यंत्र मतदान केंद्रापर्यंत पोहचवणे, तिथे सर्व गोष्टींची सुविधा उपलब्ध करणे आणि आवश्यक मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करणे हे काम जोमाने सुरु झाले आहे. याच धर्तीवर राज्यातील 288 मतदारसंघातील हजारो मतदानकेंद्रावर चोख व्यवस्थेसाठी आता शालेय शिक्षकांची नेमणूक होणार आहे. याच धर्तीवर शिक्षक शाळेऐवजी मतदानकेंद्र आणि निवडणुकीच्या कामांत व्यस्त राहणार आहेत, त्यामुळेच तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Schools to remain closed for 3 days due to voting

शिक्षण विभागाच्या शिक्षण आयुक्तांना सूचना

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी

अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. अनेक शिक्षकांची नियुक्तीही त्यासाठी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे कमेंटबाॅक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.

सलग सहा दिवस सुट्टी

राज्यातील शाळांना आज शुक्रवारी 15 नोव्हेंबरला गुरूनानक जयंतीनिमित्त सुट्टी आहे. त्यानंतर शनिवारी 16 नोव्हेंबरलाही अनेक शाळांना सुट्टी असून, दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबरला रविवार आल्याने सुट्टी आहे. त्यानंतर 18 ते 20 नोव्हेंबरलाही सुट्टी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शाळांना शुक्रवार ते बुधवार अशी सलग सहा दिवस सुट्टी मिळणार आहे.

मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा

राज्यात काही ठिकाणी एकशिक्षकी आणि द्विशिक्षकी शाळा आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी निवडणुकीच्या कामामुळे शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाही. अशा ठिकाणी शैक्षणिक कामकाज चालणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शाळांना सुट्टी देण्याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा. पुरेशा प्रमाणात शिक्षक असल्यास, तेथे शाळेचे कामकाज नियमित सुरू राहू शकते, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून सांगण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+