अशी वेळ कुणावरही येऊ नये... संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरले, म्हणाली...
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यासाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रेणापूर तालुक्यातील सुमारे ५० हून अधिक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. या विशाल जनसमुदायासमोर आज संतोष देशमुख यांची मुलगी, वैभवीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तिच्या भाषणाने सगळेच गहिवरले.

मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद
रेणापूर येथील या मोर्चात आज रेणापूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातून सर्वपक्षिय एकत्र आले होते. या मोर्चात देशमुख यांचा मुलगी व मुलगी हे दोघेही सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी मंचावर भावूक झाली. मोर्चेकऱ्यांसमोर केलेले वैभवीचे भाषण ऐकून सगळेच हळहळले.
काय म्हणाली वैभवी
मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना वैभवी म्हणाली, "माझ्या वडिलांसोबत काय झालं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांची क्रूर हत्या झाली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात. कायम आमच्यासोबत राहा. आज आमचं छत्र हिरावलं आहे, दुसऱ्या कुठल्या मुला-मुलीसोबत असं होऊ नये, आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली, तशी वेळ पुन्हा कुठल्या कुटुंबावर येऊ नये, असं म्हणतातच उपस्थितांचे डोळे पाणावले.
न्याय मिळवून द्या
वैभवी पुढे म्हणाली की, "माझे वडिल समाजसेवक होते. त्यांच्या सरपंचपदाच्या काळात गावामध्ये स्वच्छता अभियान राबवले. आमच्या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले. ज्यांना व्यसन आहे, ते व्यसन सोडवण्यासाठी माझे वडील कायम प्रयत्न करत होते. तुम्ही असेच आमच्या पाठिशी राहा, कुटुंब म्हणून सोबत राहा. जे आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला, तो पुन्हा घडू नये याची दक्षता घ्या. माझे वडिल आम्हाला सोडून गेलेत. तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या, असे आवाहन वैभवीने केले.












Click it and Unblock the Notifications