वाल्मिक कराडला मोठा धक्का! दोषमुक्ती याचिकेचं काय झालं? पुढची सुनावणी कधी होणार? जाणून घ्या सर्व
Santosh Deshmukh murder case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत बारा ते तेरा आरोप निश्चित करावेत, असा विनंती अर्ज न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केला आहे तर दुसरीकडे दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराड याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सुत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराडची दोषमुक्तीची याचिका फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार हे लवकरच कळेल तूर्त या प्रकरणात सुनावणी कधी होणार याची माहिती विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आज २२ ऑगस्ट रोजी दिली आहे.

कधी होणार खटल्यातील प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात?
माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी म्हटले की, संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दिला आहे, तो डिसाईड ज्यावेळी होईल त्याचवेळी त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल.आरोपींविरुद्ध न्यायालयाने एकदा आरोप निश्चित केले की, मग खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावलीला सुरुवात होईल.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या आणि इतर संबंधित प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने मंगळवारी वाल्मिक कराडची दोषमुक्ती याचिका फेटाळली. विशेष मकोका न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती तसेच ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.
संतोष देशमुख हत्या आणि इतर दोन प्रकरणातील एकत्रित दोषारोप बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष मकोका न्यायाधिश व्ही. एच. पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील मकोका आणि हत्येच्या दोषारोपातून आपल्याला मुक्त करावे यासाठीची याचिका वाल्मिक कराडच्या वतीने दाखल करण्यात आली होती, तर सरकार पक्षाच्या वतीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावरील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पुर्वीच पुर्ण झाले होते आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आज कराडच्या दोषमु्क्तीचा अर्ज फेटाळण्यात आला.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपपत्र संबंधित आरोपीवर दाखल करावे, या करिता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टात ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे. आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत बारा ते तेरा आरोप निश्चित करावेत अशा प्रकराचा विनंती अर्ज केलेला आहे. आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दिला आहे तो डिसाईड ज्यावेळी होईल त्याचवेळी त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल.आरोपींविरुद्ध न्यायालयाने एकदा आरोप निश्चित केले की, मग खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावलीला सुरुवात होईल.
कराडचा अर्ज विलंबाने आला - उज्ज्वल निकम
वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात जो अर्ज दिला तो विलंबाने दिला आहे. भारतीय नागरीक संरक्षण संहितेनुसार, असा अर्ज आरोपपत्र दाखल होण्याच्या दोन महिन्याच्या आत करायला हवा होता पण त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही, विलंब माफीचा अर्जही त्यांनी केलेला नाही म्हणून न्यायालयाने त्यांचा अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावा, अशा प्रकारची आम्ही मागणी केली आहे. याची सुनावणी आता ४ ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी न्यायालय घेईल असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications